चार दिवसांपूर्वी काबुल, अफगाणिस्तान येथे झालेल्या आत्मघातकी स्फोटात १९ जण दगावले होते. पुन्हा एकदा असाच स्फोट काबुलमधील शैक्षणिक संस्थेत झाला असून त्यात ४६ मुलींसह ५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. शुक्रवारी ही घटना घडली.
तालिबान सरकार आले त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तेथील अल्पसंख्याक लोकांविरोधात हे हल्ले केले जात आहेत. हजरा जमातीवर हे हल्ले केले जात आहेत. संयुक्त राष्ट्रांनी याचा निषेध केला असून याची आम्ही चौकशी करत आहोत असे म्हटले आहे. या हल्ल्यात ११० लोक जखमी झाले आहेत.
सोमवारीही असाच हल्ला हजरा जमातीवर झाला होता. शाहिद माझरी रोडवर पूल इ सुक्ता येथे ही घटना घडली. तालिबान सरकारने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या
मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त
रायगडच्या जवानाला काश्मीर खोऱ्यात आले ‘वीरमरण’
काबुलमधील प्रसारमाध्यमांनी मात्र १०० पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की मानवाधिकार संघटना इथे कार्यरत आहेत आणि त्या घटनेची अधिक सविस्तर माहिती घेत आहेत. या हल्ल्यांच्या विरोधात हजरा जमातीच्या महिलांनी तीव्र निदर्शने केली. अल्पसंख्याकांवर हल्ले करून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जात असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. काळ्या कपड्यांमध्ये या महिलांनी निषेध केला.
एकीकडे भारतात अल्पसंख्य मुस्लिमांवर हल्ले होत असल्याची हाकाटी पिटणारे अफगाणिस्तानमधील या हल्ल्यांबाबत गप्प आहेत असे पाहायला मिळाले आहे.