गेल्या ७ दशकांत अशा प्रकारचा पूर पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशात सध्या महापुराने थैमान घातले आहे. त्यातल ग्वाल्हेर-चंबल भागाला सर्वाधिक फटका मुसळधार पावसामुळे बसला आहे. विशेषतः पूल, रस्ते या पायाभूत सुविधांचे सर्वाधिक नुकसान या महापुरामुळे झाले आहे.
देशातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला. मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढले होते. ग्रामीण भागात पूर आल्याचे समजताच मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा पूर परिस्थितीच्या पाहणीसाठी आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दतिया जिल्ह्यात पोहचले आणि स्वतःचं पुरामध्ये अडकून पडले. नंतर पूरग्रस्त भागातून त्यांना वायुदलाच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
जिल्ह्यांतील गावे पुराने वेढली आहेत हे समजताच मिश्रा स्वतः एनडीआरएफच्या बोटीवरून पाहणी करता दौऱ्यावर निघाले. कोटरा गावाजवळ ते पोहचले असता त्यांच्या बोटीवर झाड पडले आणि गावातील एका घराच्या छतावर अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मिश्रा स्वतः पाण्यात पडले. घराच्या छतावरील लोकांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. गृहमंत्री मिश्रा यांना वायुदलाच्या हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले.
हे ही वाचा:
ऑलिम्पियन फुटबॉलपटू एस.एस. बाबू नारायण कालवश
चीनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
…आणि नंदुरबारच्या लहानग्याला मिळाले मुंबईत जीवनदान!
आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…
गृहमंत्र्यांच्या रेस्क्युची व्हिडिओ मात्र सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली. व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘चूक झाल्यावर त्यासाठी टोकणे हे विरोधी पक्षाचे काम आहे, तर चांगल्या कामाचे कौतुकपण केलेच पाहिजे. गृहमंत्र्यांच्या धाडसाला सलाम.’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कमल नाथ यांनी दिली आहे.