कुवेतमध्ये नुपूर विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हाकलणार

कुवेतमध्ये नुपूर विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हाकलणार

शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर पैगंबर मुहम्मद यांच्यावरील टीकेच्या विरोधात फहाहील येथे निदर्शन करणाऱ्यांना अटक करण्याच्या सूचना कुवैत प्रशासनाने जारी केल्या आहेत. सहभाग घेतलेल्या आंदोलकांना हद्दपार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशाचे कायदे आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या परदेशी नागरिकांना अटक करण्यात येणार असून त्यांना हद्दपार केले जाईल, अशी माहिती आहे. कुवेतमध्ये परदेशी नागरिकांकडून निदर्शने आयोजित करण्याला प्रतिबंध आहे. त्यामुळे त्यांनी कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. “कुवेतमधील सर्व परदेशी नागरिकांनी कुवेतमधील नियम आणि कायद्यांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांमध्ये भाग घेऊ नये,” असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या

मुलांवर आंदोलनांचे हे कसले ‘संस्कार’

भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक

‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर भाजपाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. मात्र, नुपूर शर्मा यांच्या विधानाचे पडसाद आखाती देशांमध्ये उमटले होते. तसेच देशातील काही शहरांमध्येही निदर्शने झाली होती.

Exit mobile version