मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मुईझ्झुंना सांगितले…दुराग्रह सोडा, शेजाऱ्यांशी जुळवून घ्या!

मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद सोलिहा यांचा सल्ला

मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मुईझ्झुंना सांगितले…दुराग्रह सोडा, शेजाऱ्यांशी जुळवून घ्या!

‘राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी दुराग्रहीपणा सोडून द्यावा आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेजारी राष्ट्रांशी संवाद साधावा,’ असे आवाहन मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद सोलिहा यांनी केले आहे. मोइझ्झू यांनी नुकतेच भारताकडे मालदीवला देण्यात आलेल्या कर्जातून दिलासा द्यावा, असे साकडे घातले होते. सोलिहा (६२) यांना पराभूत करून मुइझ्झू (४५) हे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले होते.

मालदीविअन डेमोक्रेटिक पक्षाचे संसदीय उमेदवार माफानू येथील चार मतदारसंघांतून लढत आहेत. त्या वेळी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ‘भारताने दिलेल्या कर्जाची पुन्हा आढावा घ्यावा, यासाठी मोइझ्झू यांना भारताशी संवाद साधायचा आहे, हे वृत्त वाचले. परंतु देशावरील आर्थिक संकट हे भारताकडून घेतलेल्या कर्जामुळे आलेले नाही,’ असे सोलिह यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

अलीगड, संभलमधील मशिदी ताडपत्रीने झाकल्या!

आंबेनळी घाटात ४०० फूट दरीत टेम्पो कोसळला

ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमर अब्दुल्लाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न!

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का

मालदीव देशावर चीनचे १६ अब्ज एमव्हीआर कर्ज आहे तर, भारताचे आठ अब्ज एमव्हीआर कर्ज आहे. तर, हे कर्ज २५ वर्षांत फेडायचे आहे. ‘मला विश्वास आहे, की शेजारी राष्ट्रे आपल्याला मदत करतील. मात्र त्यासाठी आपण दुराग्रहीपणा सोडला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधायला हवा. असे अनेक पक्ष आहेत, जे आपल्याला मदत करू शकतात. परंतु त्यांना (मुइझ्झू) तडजोड करण्याची इच्छा नाही. मला वाटते, त्यांनी (सरकारने) आता कुठे परिस्थिती समजून घेण्यास सुरुवात केली आहे,’ असे सोलिह म्हणाले.

सध्याचे सरकार केवळ मागील एमडीपी सरकारने जाहीर केलेल्या प्रकल्पांच्या पुन्हा घोषणा करत असून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मुइझ्झू यांनी मालदीवच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चार महिने उलटले असूनही त्यांनी अद्याप भारताला भेट दिलेली नाही. आतापर्यंत मालदीवच्या प्रत्येक अध्यक्षांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भारताला भेट दिल्याचा इतिहास आहे. मात्र मुइझ्झू यांनी राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर सर्वांत प्रथम भारताऐवजी चीनचा दौरा केला.

Exit mobile version