भारतावर टीका करण्यात ओबामांनी ऊर्जा घालवू नये!

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे माजी आयुक्त मूर यांनी दिला सल्ला

भारतावर टीका करण्यात ओबामांनी ऊर्जा घालवू नये!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अमेरिका दौऱ्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील अल्पसंख्यांकांच्या हक्कांसंदर्भात टिप्पणी केली होती. त्यावर आता जगभर चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ओबामा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेच पण आता अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे माजी आयुक्त जॉन मूरी यांनीही ओबामांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. भारतावर टीका करण्याऐवजी ओबामा यांनी भारताची प्रशंसा करायला हवी असे ते म्हणाले आहेत.

एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत मूरी म्हणतात की, ओबामा यांनी भारतावर टीका करण्यासाठी आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा भारताची प्रशंसा करायला हवी. भारत हा सगळ्यात विविधतेने नटलेला देश आहे. भारत हा सगळ्यात परिपूर्ण देश नसेलही, तसा अमेरिकाही परिपूर्ण देश नाही पण भारताची ताकद या विविधतेत आहे.

मूर यांनी म्हटले आहे की, त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे कौतुकच ओबामा यांनी करायला हवे होते. त्यापेक्षा मोदींना दिलेली अमेरिका भेट ही एक ऐतिहासिक भेट होती. त्याचा आनंद आपण साजरा करायला हवा. जेव्हा आपण एखाद्या लोकशाही देशाबद्दल बोलतो तेव्हा त्यावर खासगी स्वरूपात टीका केली पाहिजे, सार्वजनिक नव्हे.

हे ही वाचा:

उघड्या खिडकीजवळ जाऊ नका! रशियन बंडखोर प्रिगोझिन यांना दिला इशारा

कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख

जैन मंदिरात आता जीन्स, हाफ पँट, फ्रॉक किंवा फाटलेले कपडे बंद

१०० वर्षांची वृद्ध महिला पंतप्रधान मोदींना देणार १५ एकर जमीन!

मूर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे आध्यात्मिक सल्लागारही आहेत. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वांतत्र्य आयोगावर ते आयुक्त म्हणून अनेक वर्षे सेवेत राहिलेले आहेत. ओबामा यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत मोदींवर टीका केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, बायडेन यांनी मोदी यांच्याशी चर्चा करताना भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करायला हवा होता. आपण जर राष्ट्राध्यक्ष असतो तर आपण तो मुद्दा उपस्थित केला असता. ओबामा म्हणाले होते की, भारताने जर अल्पसंख्यांकांचे रक्षण केले नाही तर त्या मुद्द्यावर भारत विखुरला जाईल. हिंदूबहुल भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेचा मुद्दा बायडेन यांनी उपस्थित करायला हवा होता.

Exit mobile version