बीजिंगमधील कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या काँग्रेसमध्ये एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले.चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या समारोप समारंभातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले आहे. तेथे उपस्थित असलेल्या चीनच्या अध्यक्षांच्या डावीकडे बसलेल्या ७९ वर्षीय जिंताओ यांना बाहेर काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. त्याच प्रमाणे, चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो स्थायी समितीच्या इतर तीन सदस्यांना शनिवारी नवनिर्वाचित केंद्रीय समितीमधून वगळण्यात आले आहे.
चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीची २० वी काँग्रेस ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये झाली. यादरम्यान स्टेजवर बसलेल्या जिंताओ यांना दोन वेटर बाहेर घेऊन जाताना दिसले. जिंताओ यांनी प्रतिकार केला पण तो अयशस्वी ठरला. जिंताओ यांच्यासाठी ही बैठक अपमानास्पद ठरली असेल, परंतु या बैठकीमुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अधिक शक्तिशाली झाले आहेत.
चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची आठवडाभर चाललेली बैठक शनिवारी संपली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या काँग्रेसमध्ये सर्वसहमतीने शी जिनपिंग यांच्याकडे तिसऱ्यांदा नेतृत्वाची कमान सोपवण्यात आली. तर पंतप्रधान ली केकियांग यांचीही कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तिसर्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी एकमताने निवड झाली आहे. दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना अपमानास्पदरित्या बैठकीतून हाकलून देण्यात आले, तर पंतप्रधान ली केकियांग यांनाही केंद्रीय समितीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोन नेत्यांचे शी जिनपिंग यांच्याशी मतभेद होते. आता तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की केवळ शी जिनपिंगच्या जवळच्या लोकांनाच सात सदस्यीय पॉलिटब्युरोमध्ये ठेवले जाईल. तिसर्यांदा पदावर असताना शी जिनपिंग हे माओ झेडोंग यांच्यानंतरचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत.