भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या एकूणच परिस्थिती बिकट असून राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेने डोक वर काढलं आहे. पाकिस्ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नंतर आता त्यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेले अवामी मुस्लिम लीग (एएमएल) नेते शेख रशीद यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
पाकिस्ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नंतर आता शेख रशीद यांना रविवार, १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रावळपिंडीत अटक करण्यात आली. अवामी मुस्लिम लीग (एएमएल) नेते रशीद हे इम्रान खान यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातूनच अटक केली. भ्रष्ट्राचार केल्याचा रशीद यांच्यावर आरोप आहे.
रेल्वेमंत्री असताना रशीद म्हणाले होते की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास जगात अण्वस्त्र युद्ध होईल. मात्र, आता त्यांचाच देशात रशीद यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयनेही सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करून शेख रशीदच्या अटकेवर टीका केली आहे.
काही महिन्यांपूर्वी शेख रशीद यांनी घरात घुसून नोकरांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या अटके विषयी माजी मंत्र्याच्या वकिलाने सांगितले की, वर्दीत नसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी शेख रशीदसह त्यांचा पुतण्या शेख रशीद शफीक आणि त्यांच्या सहाय्यकाला अटक केली आहे.
हे ही वाचा:
रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे
सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !
कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?
‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?
२०१९ साली भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानच्या या मंत्र्याने भारता विरुद्ध गरळ ओकली होती. भारतावर अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. मात्र, त्याच शेख रशीद यांना पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.