25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया६ वर्ष अमेरिकेतील तुरुंगात, आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री

६ वर्ष अमेरिकेतील तुरुंगात, आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री

Google News Follow

Related

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने आता सरकार बनवण्याची जोरदार तयारी केली आहे. मंत्र्यांची नावं फायनल केली जात आहेत. काही अंतरिम मंत्रिपदंही दिली जात आहेत. अल जजीरा चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने जगातील सर्वात खतरनाक जेलमधील कैद्याला थेट संरक्षण मंत्री बनवलं आहे. मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर असं त्याचं नाव आहे.

मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर हा तालिबानचा अनुभवी कमांडर मानला जातो. तो तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा जवळचा मानला जातो. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, अमेरिकन सैन्याने २००१ मध्ये त्याला पकडलं होतं. त्याला २००७ पर्यंत ग्वांटानामो बे इथल्या जेलमध्ये डांबण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला सोडून अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आलं होतं.

मुल्ला अब्दुलहा अत्यंत धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक समजला जातो. त्यामुळेच अमेरिकेच्या सर्वात सुरक्षित, कडक पहारा असलेल्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. ग्वांटानामो बे म्हणजेच खाडीत अमेरिकी सैन्याचं एक अत्यंत सुरक्षित-हाय सिक्युरिटी असणारं जेल आहे. क्युबा इथं हे जेल आहे. या जेलमध्ये जगातील सर्वात खतरनाक आणि हायप्रोफाईल दहशतवाद्यांना ठेवलं जातं.

तालिबानने अफगाणिस्तानात अजून औपाचारिकपणे सरकार बनवलेलं नाही. मात्र देशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्या संघटनेच्या काही नेत्यांना प्रमुख पदं दिली आहेत. यामध्ये हाजी मोहम्मद इदरीसचाही समावेश आहे. इदरीसला अफगाणिस्तानची केंद्रीय बँक द अफगाणिस्तान बँकेचा कार्यकारी प्रमुख नियुक्त केलं आहे.

हे ही वाचा:

सीडीएस, जनरल बिपिन रावत यांनी तालिबानला दिला ‘हा’ इशारा

हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत ‘भोक पडलेल्या फुग्याला’ एवढे का घाबरत आहेत?

राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?

बापरे! त्याने केला आरोग्याशी ६८४ कोटींचा खेळ

अफगाण न्यूजच्या मते, तालिबानच्या मंत्रिमंडळात सखउल्लाहला शिक्षण मंत्रिपद, अब्दुल बाकी उच्च शिक्षण मंत्री, सदर इब्राहिम गृहमंत्री, गुल आगा अर्थमंत्री, मुल्ला शिरीन काबूलचा गव्हर्नर, हमदुल्ला नोमानी काबूलचा महापौर आणि नजीबुल्लाहला गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख बनवण्यात आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा