फ्रान्सचे माजी राष्ट्रपती तुरुंगात

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती तुरुंगात

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सार्कोझी यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर निकोलस सर्कोझी हे आधुनिक फ्रान्सचे, भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाणारे दुसरे राष्ट्रपती ठरले आहेत.

राष्ट्रपतीपदावर असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले सर्कोझी हे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत. सर्कोझी यांच्यामते मात्र ते पूर्णपणे निर्दोष आहेत आणि ते वरच्या कोर्टात याविषयी अपीलही करणार आहेत. सर्कोझी यांच्यावर न्यायाधीशांना लाच देण्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायाधीशांना निवृत्तीनंतर महत्वाच्या पदावर नियुक्त करण्याचे आश्वासन देऊन स्वतःवर सुरु असलेल्या एका महत्वाच्या केसची माहिती घेण्याचा आरोप सर्कोझी यांच्यावर करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

बायडन सरकारमध्येही आता भारत विरोधकांना थारा नाही?

२००७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये एका कंपनीकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या आरोपावर एक केस कोर्टात होती. या केस संदर्भातील काही गोपनीय माहिती घेण्यासाठी न्यायाधीशांना आमिश दाखवले होते. न्यायाधीशांना निवृत्तीनंतर मोठे पद देण्याचे आमिश दिल्याचा आरोप सार्कोझी यांच्यावर आहे.

फ्रान्समध्ये २०२२ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर ही एक मोठी घडामोड आहे.

Exit mobile version