‘चीनला शिकवलेला धडा जिनपिंग कधीही विसरणार नाहीत’

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी कथन केला गलवान खोऱ्यातील प्रसंग

‘चीनला शिकवलेला धडा जिनपिंग कधीही विसरणार नाहीत’

‘चीन हा त्याच्या छोट्या छोट्या शेजारी राष्ट्रांना घाबरवण्यासाठी व धमकावण्यासाठी नेहमीच डिवचत आला आहे. त्यामुळेच सन २०२०मध्ये पूर्व लडाख भागात भारतीय लष्कराने पलटवार करून चीनला त्यांची जागा दाखवून दिली. दोन दशकांत पहिल्यांदाच चीन आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ला तीव्र प्रत्युत्तराचा सामना करावा लागला,’ असे भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

 

नरवणे यांनी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या त्यांच्या पुस्तकात गलवान खोऱ्यांत भारत आणि चीनच्या सैन्यदलात झालेल्या संघर्षाबाबत माहिती दिली आहे. ‘चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग १६ जून हा दिवस कधीही विसरणार नाहीत. हा दिवस शी जिनपिंग यांचा वाढदिवसही आहे. हा असा दिवस नाही की जो ते लवकरच विसरतील,’ असे या पुस्तकात नमूद केले आहे.

 

नरवणे हे ३१ डिसेंबर २०१९ ते ३० एप्रिल, २०२२पर्यंत लष्करप्रमुख होते. या त्यांच्या कार्यकाळात त्यांना वादग्रस्त सीमेवर चीनने दिलेल्या आव्हानांचा सामना करावा लागला. या काळात त्यांनी सैन्यदलाचे लष्करी बळ वाढवण्यासाठी विविध उपाय अवलंबण्यावर लक्ष केंद्रित केले.

हे ही वाचा:

एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!

अतिक अहमदचा सहकारी नफिस बिर्याणी मृत्युमुखी!

दाऊदच्या बातमीनंतर डोंगरीत सन्नाटा…

अतिक अहमदचा सहकारी नफिस बिर्याणी मृत्युमुखी!

 

सैनिकांचे हुतात्मा होणे, हा सर्वांत दुःखद दिवस

जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षात २० जवान हुतात्मा झाले होते. तो दिवस माझ्या संपूर्ण कारकिर्दीतला सर्वांत दुःखद दिवसांपैकी एक होता, असे नरवणे यांनी लिहिले आहे. ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ या प्रकाशकांनी नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ते पुढील महिन्यात बाजारात दाखल होईल. यात नरवणे यांनी लष्करी अधिकारी म्हणून गेल्या ४० वर्षांतील प्रवास आणि २८वे लष्करप्रमुख म्हणून पोहोचल्यानंतर केलेली कामगिरी याचे वर्णन केले आहे.

Exit mobile version