पूर्वीच्या अफगाण सरकारचे सदस्य तालिबानविरुद्ध लढण्यासाठी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया-खोरासानमध्ये (ISIS-K) सामील झाले आहेत, असे एका अहवालातून उघड झाले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचा हवाला देत खामा प्रेसने म्हटले आहे की अफगाणिस्तानमधील मागील सरकारच्या गुप्तचर संस्थेचे सदस्य तालिबानला हरवण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आता ISIS-K मध्ये सामील होत आहेत.
प्रकाशनानुसार, माजी सुरक्षा कर्मचारी बहुतेक यूएस-प्रशिक्षित अफगाण हेर आहेत जे उत्तर अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटात सामील झाले आहेत.
तालिबानचा ताबा घेतल्यानंतर, पंजशीर प्रांतात अहमद मसूद आणि माजी प्रथम उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या सह-नेतृत्वाखालील उत्तरेकडील प्रतिकार हा एकमेव प्रतिकार करणारा गट होता.
खामा प्रेस नुसार, वॉल स्ट्रीट जर्नलचा अहवाल पुढे असं सांगतो की माजी अफगाण गुप्तहेर त्यांचे उत्पन्न पुन्हा सुरू करण्यासाठी ISIS-K मध्ये सामील होत आहेत. कारण ते सरकार कोसळल्यानंतर त्यांच्या उत्पन्नाचे साधन संपले आहे. आणि तालिबानशी लढण्यासाठी देखील ते ISIS-K मध्ये सामील होत आहेत.
हे ही वाचा:
नवाब मलिक तुम्ही मर्द असाल तर माझ्याऐवजी देवेंद्रजींना लक्ष्य करा!
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल
राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी
अफगाणिस्तानमध्ये लक्ष्यित हत्या आणि बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नांगरहारला लक्ष्यित हत्या आणि बॉम्बस्फोटांचा सामना करावा लागत आहे, ज्यामध्ये ISIS-K ने अनेक हल्ल्यांचा दावा केला आहे. इस्लामिक स्टेट (IS) शी संलग्न असलेल्या तब्बल ६५ दहशतवाद्यांनी तालिबानच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे.