अबुधाबीत साकारत आहे पहिले हिंदू मंदिर, मोदी करणार उदघाटन!

मंदिराच्या सोहळ्यासाठी अबुधाबीत जय्यत तयारी

अबुधाबीत साकारत आहे पहिले हिंदू मंदिर, मोदी करणार उदघाटन!

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर आता संयुक्त अरब अमिराती मधील अबूधाबी येथे बांधण्यात येत असलेल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे.या मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.त्यासाठी अबुधाबी येथे जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.मुस्लिम देशात हे हिंदूंचे पहिले मंदिर आहे.बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) या मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेतली आहे.

बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक नेते प्रमुख स्वामी महाराज यांच्या १९९७ सालीच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) भेटीदरम्यान अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर बांधण्याची कल्पना मांडली होती. “देश, संस्कृती आणि धर्म” यांच्यात एकता वाढवणे हे त्यांचे ध्येय होते.सद्भावनेच्या दृष्टीने संयुक्त अरब अमिराती सरकारने ऑगस्ट २०१५ मध्ये मंदिरासाठी जमीन देण्याचा निर्णय जाहीर केला.त्यानुसार अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी मंदिरासाठी जमीन भेट म्हणून दिली.

१० फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली बीएपीएस प्रतिनिधींनी शेख मोहम्मद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि मंदिर प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.त्यानंतर मंदिराची पायाभरणी २० एप्रिल २०१९ रोजी झाली.बीएपीएस स्वामिनारायण मंदिर संस्थानचे महंत स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व भारतासह संयुक्त अरब अमिरातमधील (यूएई) हिंदू-मुस्लिम समाजाच्या हजाराे नागरिकांच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला.या वेळी यूएईसह जगभरातील अडीच हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिक व भारताचे राजदूत नवदीप सुरी, मंदिर समितीचे प्रमुख व समाजसेवक , यूएईचे हवामानमंत्री थानी अल झाैदी, उच्च शिक्षण व उच्चस्तरीय राज्यमंत्री अहमद बिलावल फलासी, भारतातील ५० पुजारी आदी उपस्थित हाेते.

हे ही वाचा:

‘मुळशी पॅटर्न’ प्रमाणे पुण्यात ‘पिट्याभाईं’ची पोलिसांनी काढली परेड

निवृत्त सैनिक बनला होता लष्करचा दहशतवादी, दिल्लीतून अटक!

राहुल गांधींनी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेले बिस्किट दिल्याने हंगामा

वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार

हे भव्य-दिव्य मंदिर १३.५ एकर (५५ हजार चाैरस मीटर) जमिनीवर साकारले जाणार आहे.या मंदिराचे डिझाइन आरएसपी आर्किटेक्ट्स प्लॅनर्स अँड इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कॅपिटल इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स कंपनीने केले आहे.हे मंदिर पश्चिम आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असणार आहे.या मंदिरामध्ये तब्बल १०,००० लोक उपस्थित राहू शकतात. २७ एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आले आहे.मंदिराचे बांधकाम करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.मंदिराची पायाभरणी करत असताना ३५० हुन अधिक सेन्सर सर्वत्र वितरित करण्यात आले आहे.त्यामुळे भूकंप, तापमान चढउतार आणि दाबातील बदल, अशी माहिती सेन्सरद्वारे कळणार आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी पूर्णपणे गुलाबी व संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला आहे. हे दगड राजस्थान आणि इटली येथून आलेले आहेत.विशेष म्हणजे, भारतातील १,५०० हुन अधिक कुशल कारागिरांकडून या दगडांवर काेरीव काम, नक्षीकाम आदी केले आहे, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि हिंदू वारशांची शिल्पे तयार केली आहेत.या मंदिराला सात कळस असून संयुक्त राष्ट्र अमिरातील सात राज्याचं हे प्रतिनिधित्व करतात. या सात मंदिराच्या समूहात आपल्या देशातील विविध देवी देवतांचे मूर्ती बसवण्यात आले आहेत.

दगडांवर कोरीव काम झाल्यानंतर हे अबू धाबीला पाठवण्यात आले.त्यानंतर कंपनीच्या इंजिनिअर्स आणि कामगारांनी कोरीवकाम केलेल्या दगडांची मांडणी करत मंदिरात स्थापित केले.मंदिराच्या बांधकामासाठी दिरहम ४०० दशलक्ष इतका खर्चाचा अंदाज आहे.तसेच मंदिराच्या बांधकामासाठी भक्तांकडून देणग्या येत आहेत.तसेच मंदिराचे बांधकाम हे अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामाच्या धर्तीवर करण्यात आले आहे , त्यामुळे या मंदिराला पुढील एक हजार वर्षापर्यंत कुठलेही नुकसान होणार नाहीये.दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे.या सोहळ्याला शेख मोहम्मद, महंत स्वामी महाराज आणि भारत आणि UAE मधील इतर मान्यवर पाहुणे आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version