पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन येथील रोनाल्ड रिगन सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भारतातून चुकीच्या मार्गाने बाहेर गेलेल्या १०० हून प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तू अमेरिकेने परत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ‘या प्राचीन वस्तू खूप वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचल्या होत्या. या वस्तू परत करण्याचा निर्णय घेणाऱ्या अमेरिकी सरकारचे मी आभार मानतो. जेव्हा एक देश दुसरा देश आणि तिथल्या माणसांच्या भावनांचा आदर करतो तेव्हा दोन्ही देशांमधील नाती अधिक दृढ होतात. गेल्यावेळीसुद्धा मला अनेक महत्त्वाच्या वस्तू परत दिल्या गेल्या होत्या. मी जगभरात जिथे कुठे जातो, तिथल्या लोकांना वाटतं की मी योग्य व्यक्ती आहे. त्याला वस्तू द्या, तो योग्य ठिकाणी घेऊन जाईल,’ असे मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी गुगलचे एआय सेंटर १०० हून अधिक भाषांवर काम करेल, असे सांगितले. त्यामुळे ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही, त्या मुलांना अभ्यास करणे सोपे होईल. सर्वांत जुनी असणारी तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृतीचा प्रभाव वाढवण्यास मदत मिळेल. सर्वांत प्राचीन अशी तमिळ ही आमची भाषा असल्याचा आम्हाला गर्व आहे, असे ते म्हणाले.
अमेरिकेतच एच१ बी व्हिसाची मुदत वाढवता येणार
आता एच १ बी व्हिसाची मुदत वाढविण्यासाठी अमेरिकेबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या वर्षी त्याची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर केली जाईल. याचा सर्वाधिक फायदा आयटी व्यावसायिकांना होईल.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना
पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी, आठवीच्या परीक्षेत पास व्हावचं लागणार!
‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक
गेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम
नव्या भारतात पुन्हा आत्मविश्वास
‘सर्व जगाचे लक्ष भारताकडे आहे. हा १४० कोटी भारतीयांचा आत्मविश्वास आहे. शेकडो वर्षांच्या गुलामीने हा आत्मविश्वास आपल्यापासून हिरावून घेतला होता. आज मात्र जो नवा भारत उदयाला आला आहे, त्याच्यात हा आत्मविश्वास परत आला आहे. हा तो भारत आहे, ज्याला आपला मार्ग आणि दिशा ठाऊक आहे. हा तो भारत आहे, ज्याला आपले निर्णय आणि संकल्पांवर पूर्ण विश्वास आहे. आज नव्या भारताची कथा छोट्या छोट्या शहरांमध्ये लिहिली जात आहे,’ असेही ते म्हणाले.