‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी म्हणजेच उद्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तर ट्विटरवर या चित्रपटाचे नाव ट्रेंडवर आहे. तसेच या चित्रपटाबद्दल चाहते आपली मते मांडत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक या चित्रपटाला जोरदार पाठिंबा देत आहेत. ट्विटरवर हॅशटॅग ‘काश्मीर फाइल्स’ आणि हॅशटॅग ‘काश्मीरी पंडित’ हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. चाहत्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याचीही मागणी केली आहे. एका चाहत्याने तर ट्विटरवर केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. त्याने ट्विट केले आहे की, ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट देशभरात मोफत व्हावा अशी मागणी या चाहत्याने केली आहे. तसेच अनेक जणांनी लोकांना हा चित्रपट पाहण्यास सांगितले आहे.
I am humbled to see #TheKashmirFiles trending at no 1 even on an Election Day. pic.twitter.com/ArsXIJafJO
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 10, 2022
चाहत्यांचा चित्रपटाला पाठिंबा पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजनही खूश आहेत आणि त्यांनी यासाठी लोकांचे आभारही मानले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे, जो आजच्या निवडणुकीच्या निकालाचा आहे. या फोटोसाठी त्यांनी लिहिले की, ‘मला खूप आनंद होत आहे की निवडणुकीच्या निकाला दिवशी ही काश्मीर फाइल्स ट्रेंडिंग करत आहे.’
हे ही वाचा:
काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास
शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा अभिनेता पाशा ली ठार
हा चित्रपट १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये निर्मात्यांनी काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी जम्मूमध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. येथे हा चित्रपट काश्मिरी पंडितांना दाखवण्यात आला, ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येकजण भावूक होताना दिसत होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी दिग्दर्शक विवेक रंजनचे कौतुक केले होते.