सर्वाधिक लसीकरण होऊनही कोरोना रुग्णसंख्या दुप्पट!

सर्वाधिक लसीकरण होऊनही कोरोना रुग्णसंख्या दुप्पट!

जगात कोविडच्या विषाणुने धुमाकूळ घातला आहे. त्याविरूद्धचे प्रभावी अस्त्र म्हणून लसीकरण केले जात आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक लसीकरण झालेला देश म्हणून बोलबाला झालेल्या सेशेल्स देशात कोरोना रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढली आहे. ही संख्या अचानकच दुप्पट झाल्याने तेथील आरोग्य अधिकारी हैराण झाले आहेत. यामुळे लस विषाणुवर प्रभावी ठरत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेनं या आकडेवारीची समीक्षा करणार असल्याचे म्हटले आहे.

सेशेल्समध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वाधिक लसीकरण झाले आहे. कोणत्या लशीच्या व्यापक समीक्षेशिवाय ती लस कमी प्रभावी आहे, असे म्हटले जाऊ शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या आधी सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात करोनाची बाधा झालेल्यांपैकी एक तृतीयांश जणांना करोनाची दोन्ही डोस देण्यात आले होते. सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार करोनाबाधितांची संख्या मागील आठवड्यात २४८६ झाली होती.

हे ही वाचा:

अरबी समुद्रावर घोंगावते आहे वादळ

सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी केट ओ ब्रायन यांनी म्हटले की, आम्ही सेशेल्स सरकारच्या संपर्कात आहोत. व्यापक समीक्षेदरम्यान विषाणूच्या स्ट्रेनबाबत आणि बाधितांची संख्या याबाबत गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी करोना लस घेतलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे. ज्या बाधितांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, त्यांना करोना लस देण्यात आली नव्हती.

बाधित असलेल्या २४८६ जणांपैकी ३७ टक्के जणांना करोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. सेशेल्समध्ये ५७ टक्के जणांना चीनची सायनोफार्म लस देण्यात आली. तर, उर्वरित जणांना भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड लस देण्यात आली.

Exit mobile version