तालिबानच्या जाचातून वाचवण्यासाठी आता अनेकांनी भारताकडे पलायन केलेले आहे. काबुलहून भारतात आलेल्या १६८ लोकांच्या गटात दोन अफगाण सिनेटरचाही समावेश आहे. त्यापैकी एक सिनेटर नरेंद्र सिंह खालसा यांच्या डोळ्यातील अश्रूच त्यांच्यावरील आपबीती सांगत होते. भारतात आणल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार तर मानलेच. शिवाय आपण सुखरूप येथे पोहोचल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, काबूलच्या विमानतळावर पोहोचणे खूप कठीण आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या दरम्यान, तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवारी, तेथून १६८ लोकांना परत आणण्यात आले, ज्यात अफगाणिस्तानचे शीख खासदार नरेंद्र सिंह खालसा यांचा समावेश आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि भारतीय हवाई दलाचे आभार मानले की त्यांना आणि अफगाणिस्तानातून समुदायाची सुटका केली. आज १६८ लोकांना घेऊन हवाई दलाचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले.
तेथील परिस्थितीबद्दल बोलताना अफगाणिस्तानचे खासदार भावूक झाले आणि अश्रू ओघळले. खासदार म्हणून आपला देश सोडल्यानंतर तुम्हाला कसे वाटले असे विचारले असता ते म्हणाले की आता सर्व काही संपले आहे. ते म्हणाले, गेल्या २० वर्षात जे काही कमावले ते आता संपले आहे. आता केवळ शून्य बाकी आहे. ‘ नरेंद्र सिंह खालसा हे त्या १६८ लोकांपैकी आहेत ज्यात २३ अफगाण शीख आणि हिंदू होते. हे लोक भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानात होते आणि आज काबूल विमानतळावरून उड्डाण केले.
हे ही वाचा:
हिंदू बांधव दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच
लसीचे दोन्ही डोस घेऊनही दहीहंडीला परवानगी नाहीच
उद्धव ठाकरेंचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे
महाराष्ट्राचा मृत्यूदर आता जागतिक पातळीवरही सर्वाधिक
अफगाणिस्तान खासदार पुढे म्हणाले की युद्धग्रस्त देशात किमान २०० हिंदू शीख अडकले आहेत. ते म्हणाले, ‘परिस्थिती चिंताजनक आहे. पण धार्मिक स्थळे अजूनही सुरक्षित आहेत. खालसा असेही म्हणाले, “तालिबान लोकसभा सदस्य, सिनेटर आणि इतरांना त्यांची घरे शोधून आणि बंदुका आणि वाहने जप्त करून त्रास देत आहेत.” अफगाणिस्तानातून आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आराम आहे. बचावलेल्यांमध्ये अनेक लहान मुलेही आहेत. भारतीय हवाई दलाच्या विमानाने अफगाणिस्तानमधील काबूल येथून १०७ भारतीय नागरिकांसह १६८ जणांना घेऊन उड्डाण केले. विमानतळावर कोविड – १९ ची आरटी-पीसीआर चाचणी सुद्धा आता केली जात आहे.