एरिक्सन कोसळला, सामना स्थगित

एरिक्सन कोसळला, सामना स्थगित

युरो कप फुटबॉल स्पर्धेचा तिसरा सामना वैद्यकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. शनिवार, १२ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता डेन्मार्क आणि फिनलँड या दोन संघाचा सामना सुरू होता. यात डेनमार्क संघाचा महत्त्वाचा खेळाडू क्रिश्चियन एरिक्सन हा मैदानात अचानक कोसळल्यामुळे सामन्यात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. त्यामुळेच हा सामना रद्द करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला आहे.

११ जून पासून युरो कप फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आतापर्यंत या स्पर्धेचे दोन सामने पूर्ण झाली असून शनिवारी रात्री साडेनऊ वाजता डेन्मार्क आणि फिनलँड या दोन संघांमध्ये सामना खेळला जात होता. सुरुवातीपासूनच हा सामना अतिशय रंगतदार सुरू होता. पण सामन्याच्या पहिल्या सत्राची अंदाजे चाळीस मिनिटं झालेली असताना एक दुर्दैवी घटना मैदानात घडली.

हे ही वाचा:

कोरोनामुळे अवैध बांधकामे वाढली!

संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे

स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स आठवा सामनाही अनिर्णीत

ठाकरे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर

खेळ सुरु असताना बॉल मैदानाबाहेर जाऊन डेनमार्क संघाला बॉल थ्रो करायची संधी मिळाली. हा थ्रो घेण्यासाठी डेन्मार्कचा खेळाडू सरसावला असून त्याच्याजवळच डेन्मार्कचा प्रसिद्ध खेळाडू ख्रिश्चन एरिक्सन उभा होता. बॉल एरिक्सनकडे फेकण्यात आला आणि बॉलच्या दिशेने धावता-धावता एरिक्सन अचानक जमिनीवर कोसळला. एरिक्सनच्या आसपास प्रतिस्पर्धी संघाचे कोणतेच खेळाडू नसल्यामुळे एरिक्सनचे असे कोसळणे खेळाच्या ओघात घडले नसल्याचे लक्षात आले. सामन्याच्या पंचांकडून लगेचच त्याची दखल घेत वैद्यकीय मदत मागवण्यात आली.

मैदानात अचानक कोसळलेल्या एरिक्सनला मैदानात सिडीआर देण्यात येत होता. पण तरीही एरिक्सन मैदानात उठला नाही. अखेर काही कालावधीनंतर वैद्यकीय कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आल्याचे यूएफाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान एरिक्सनला नेमके काय झाले हे समोर आले नसले तरीही त्याची प्रकृती स्थिर असून तो शुद्धीत आल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version