अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट

रस्त्यांवर फडकले भगवे ध्वज; बाईल रॅलीचे आयोजन

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट

वॉशिंग्टन डीसी शहरात हिंदू अमेरिकींनी अयोध्या राम मंदिराच्या आगामी प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘अयोध्या वे’ रस्त्यावर एका स्थानिक हिंदू मंदिर श्री भक्त अंजनेय मंदिरात एका मिनी कार आणि बाइक रॅलीचे आयोजन केले होते.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरातील हिंदू नागरिकांमध्ये उत्साहाची लाट आली आहे. रविवारी अमेरिकेतही या निमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. वॉशिंग्टनमधील हिंदू रहिवाशांनी अयोध्या वे रस्त्यावर असलेल्या श्री अंजनेय मंदिरात गाडी आणि बाइक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान गाडी आणि बाइकवरून भगवे ध्वज फडकवण्यात आले.

अमेरिकेमध्ये राहणारे हिंदू नागरिक राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरी पाच दिवे प्रज्वलित करणार आहेत. या निमित्त अमेरिकेतील विविध शहरांमध्ये कार रॅली काढली जाणार आहे. राममंदिराच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.

हे ही वाचा:

युद्धसमाप्तीनंतर गाझामध्ये ‘नागरी सरकार’ची स्थापना

पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डीनल अन्जेलो बेक्यूना तुरुंगवासाची शिक्षा

बिहारमध्ये डॉक्टरांची दारू पार्टी!

नागपूर; सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू!

‘अमेरिकेतही या निमित्त मोठा सोहळा आयोजित केला जाणार आहे. एक हजारांहून अधिक मंदिरे आणि व्यक्ती यात सहभागी होतील. विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. राममंदिराच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपणही केले जाईल. अमेरिकी नागरिकांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत मोठा उत्साह आहे. मोठ्या संख्येने हिंदू समाजाला अयोध्येत जाण्याची इच्छा आहे,’ अशी माहिती विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिकेचे अधिकारी अमिताभ मित्तल यांनी दिली. ‘राम मंदिरासाठी अगणित लोकांनी संघर्ष केला आहे. आमचीही इच्छा आहे की, आम्ही अयोध्येला जाऊ,’ असे अमेरिकेत राहणारे हिंदू समाजाचे डॉ. भरत बरई यांनी सांगितले.

Exit mobile version