गळाभेट, मग खांद्यावर हात, पंतप्रधान मोदी अन झेलेन्स्की यांची ऐतिहासिक भेट !

विविध विषयांवर चर्चा

गळाभेट, मग खांद्यावर हात, पंतप्रधान मोदी अन झेलेन्स्की यांची ऐतिहासिक भेट !

पोलंडहून १० तासांचा प्रवास केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२३ ऑगस्ट) ट्रेनने युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांचे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले. काही वेळानंतर पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यानचा तो क्षण अत्यंत भावनिक होता. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी आधी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना मिठी मारली. या दृशाने संपूर्ण जगाला संदेश दिला की, भारत युक्रेनचे दुखः समजून घेत आहे आणि त्याच्या संघर्षात भारत त्याच्यासोबत उभा आहे. पंतप्रधान मोदी यांचा युक्रेन दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. भारतीय पंतप्रधानांनी युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.

पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांनी किवच्या ‘मार्टीलॉजिस्ट एक्सपोझिशन’ला भेट दिली. युद्धाच्या परिस्थितीचे फोटो चित्रफितीद्वारे पंतप्रधान मोदींनी पाहिले. यावेळी पंतप्रधान मोदींचा हात झेलेन्स्की यांच्या खांद्यावर होता. झेलेन्स्कीसाठीही ही भेट खूप महत्त्वाची होती. या भेटीमुळे दोन्ही देशात नवीन संबंध निर्माण होवू लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सकाळी कीव येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी ‘ओयेसीस ऑफ पीस’ उद्यानाला भेट देत महात्मा गांधीना आदरांजली वाहिली. दरम्यान, १९९१ साली युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर युक्रेनला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

हे ही वाचा :

‘महाराष्ट्र बंद’ करण्याचा राजकीय पक्षांना अधिकार नाही, न्यायालयाने मविआला फटकारले

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही! म्हणत शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब हल हसनवर हत्येचा गुन्हा

बदलापूर; आरोपीची आई म्हणते, ‘मुलगा दोषी असल्यास फाशी द्या’

दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, कीवमधील पंतप्रधानांच्या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. राजकीय, व्यापार, आर्थिक, गुंतवणूक, शिक्षण, सांस्कृतिक, देवाणघेवाण, मानवतावादी सहाय्य आणि इतर मुद्द्यांचा समावेश होता. पंतप्रधान मोदींचा दौऱ्याचा उद्देश केवळ तणाव कमी करणे नव्हे तर शांतात आणि सहकार्याच्या दिशेने नवीन पावले टाकणे हा होता. पंतप्रधान मोदींची ही भेट केवळ सात तासांची होती पण त्यांनी काही तासात युक्रेनच्या लोकांच्या हृदयावर खोलवर छाप सोडली आहे.

Exit mobile version