भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिक डबघाईला चालली आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. देशातील परिस्थिती बिकट होत असताना शुक्रवार मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केली आहे.
देशातील आर्थिक संकटामुळे जनता रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेतील प्रमुख विरोधी पक्षाने नुकताच सरकार आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. विरोधकांचा आरोप आहे की, जेव्हा देश सर्वात वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहे, तेव्हा राजपक्षे यांनी त्यांची कामगिरी योग्यप्रकारे बजावलेली नाही.
हे ही वाचा:
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी
महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई
दिल्ली, पंजाब, हरयाणा पोलिसांच्या तावडीत सापडले भाजपा प्रवक्ते ताजिंदर बग्गा
‘न्यायालयाने केला ठाकरे सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश केला’
देशामध्ये मागील काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर, गॅसचा आणि इंधन तुटवडा अशा समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. वीज वाचवण्यासाठी सरकारने पथदिवे बंद केले होते. काही दिवसांपूर्वी औषधांच्या कमतरतेचं कारण देत शस्त्रक्रीया थांबवल्या होत्या. यापूर्वीही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवार, १ एप्रिल रोजी रात्री आणीबाणी जाहीर केली होती.