अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू

अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू

Sri Lanka waving flag. National 3d Sri Lanka flag waving. Sign of Sri Lanka seamless loop animation. Sri Lanka flag HD resolution Background

भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत आहे. दरम्यान, देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर श्रीलंकेच्या जनतेच्या रोषाचे धनी झालेले अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आपल्या कुटुंबासह देशातून पळ काढला आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आपल्या कुटुंबासोबत एका लष्करी विमानाने मालदीवला पलायन केले. त्यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. देशाच्या पश्चिम भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी सुरक्षादलांना त्रास देणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. उपद्रवकारी नागरिकांची वाहने जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

अध्यक्ष राजपक्षे देश सोडून मालदीवला गेल्याचे समजताच संतप्त नागरिकांनी कोलंबो येथे ‘फ्लॉवर स्ट्रीट’ येथील पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या कार्यालयाकडे कूच केले. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाजवळ जमलेल्या आंदोलकांवर अश्रुधूर सोडण्यात आला. तरीही त्याला न जुमानता हे आंदोलक प्रवेशद्वार तोडून पंतप्रधान कार्यालयात घुसले. याआधीच विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याचे मान्य केले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदेंकडून वसई दुर्घटनेतील मृतांना ६ लाखांची मदत जाहीर

धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

श्रीलंकेतील नागरिकांचा सहनशक्तीचा बांध फुटलेला असून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला आहे. या आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कडे भेदून राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. नॅशनल टीव्हीवरही त्यांनी कब्जा मिळवला आहे.

Exit mobile version