शस्त्रांच्या निर्यातीत आपणही मुसंडी मारू या उद्देशाने चीन आणि पाकिस्तान यांनी जेएफ १७ हे एअरक्राफ्ट बनवले खरे पण म्यानमारला दिलेले हे एअरक्राफ्ट खराब झाले आहे. निर्यातीसाठी या दोन देशांनी उंच उडवलेले विमान मात्र जमिनीवर आले आहे.
या घटनेमुळे चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. दोन्ही देशांनी मिळून या एअरक्राफ्टची निर्मिती केली होती. पण त्याची निर्यात ही पाकिस्तानने केली. आता मात्र तांत्रिक दोष असल्यामुळे या विमानाची पूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार म्यानमारचे लष्करी अधिकारीदेखील पाकिस्तानात पोहोचले आहेत त्यांनी हा नेमका दोष काय आहे, याची माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे.
हे ही वाचा:
मराठी चित्रपटसृष्टीच्या मनोरंजनाचा ‘दादा’ माणूस
जगातील सर्वात मोठे पक्ष्याचे शिल्प बघितले आहे का?
पाकिस्तानी तरुणांना नकोसा झालाय त्यांचा देश!
चिनाय कॉलेजची जागा बांधकाम व्यावसायिकांना विकण्याचा घाट; प्रशासक नेमण्याची मागणी
चीन आणि पाकिस्तान या दोन देशांनी मिळून जेएफ १७ ही ११ विमाने तयार केली आहेत. सध्या म्यानमारमध्ये बंडखोर आणि लष्कर यांच्यात संघर्ष सुरू असून त्यांच्याशी निपटण्यासाठी ही विमाने त्यांनी म्यानमारला उपलब्ध करून दिली आहेत. पण त्यात तांत्रिक दोष असल्यामुळे आता विमानांची तपासणी करावी लागेल.
म्यानमारमधील नेत्या आँग सान सू यांना अटक करण्यात आल्यानंतर आणि रोहिंग्यांवरील अत्याचारामुळे पश्चिमेतील देशांनी म्यानमारला शस्त्रास्त्रे पुरविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शस्त्रांसाठी त्यांनी चीन-पाकिस्तानकडे मागणी केली होती. त्यातून चीन पाकिस्तान आणि म्यानमार यांच्यातील संबंध दृढ झाले आहेत. मात्र या दोस्तीमुळे भारतापुढील समस्या वाढू शकते. भारताची कोंडी करण्यासाठी म्यानमारची सोबत त्यांना उपयोगाची वाटते. तिथे आंग सान सू यांची पाठराखण भारताने केली आहे.