एलोन मस्कचा न्यूरालिंक प्रकल्प धोक्यात?

एलोन मस्कचा न्यूरालिंक प्रकल्प धोक्यात?

एलोन मस्क त्यांच्या न्यूरालिंक कंपनीच्या माध्यमातून मानवी मेंदूमध्ये चीप घालण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मनाने विचार करूनच अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते, असे मानले जाते. परंतु टेस्लाचे मालक मस्कच्या या प्रकल्पाचे वास्तव खूपच भयावह आहे.

आता एलोन मस्कच्या ब्रेन चीपच्या न्यूरालिंक प्रकल्पासंदर्भात एक नवीन अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, न्यूरालिंक चीपची चाचणी २३ माकडांवर करण्यात आली होती, त्यापैकी सुमारे १५ माकडांचा मृत्यू झाला आहे. या माकडांना २०१७ ते २०२० दरम्यान कॅलिफोर्निया विद्यापीठात ही चीप बसवण्यात आली होती.
फिजिशियन समितीने सातशेहून अधिक पानांच्या कागदपत्रांचा आणि इतर नोंदींचा अभ्यास केला. त्या अभ्यासानंतर एलोन मस्कच्या न्यूरालिंकबाबत समितीने मोठा खुलासा केला आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

भारताने घातली आणखी ५४ चिनी ऍप्सवर बंदी

नवा हिंदुहृदयसम्राट? घाटकोपरमध्ये झळकले बॅनर

काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

चीप लावण्यात आलेल्या माकडांच्या आरोग्यावर सौम्य परिणाम झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. माकडांच्या कवटीला छेद करून न्यूरालिंक चीप घातली गेली होती. यामुळे त्या माकडांना रक्ताचा संसर्ग झाला तसेच त्यांना सतत उलट्या होऊ लागल्या आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात बहुतेक प्राण्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे समोर आले आहे.

पीसीआरएमने याबाबत अमेरिकेच्या कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. ज्यामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ डेव्हिस आणि एलोन मस्कच्या न्यूरालिंकवर प्राणी कल्याण कायद्याचे नऊ उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, न्यूरालिंक या वर्षापासून मानवांवर चाचणी सुरू करणार आहेत. मात्र, हा खुलासा झाल्यानंतर या प्रकल्पाचे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version