इलॉन मस्क या अब्जाधीशाने तालिबान-अफगाणिस्तान विषयावर अत्यंत अजब ट्विट केलं आहे. संपूर्ण जगाला जिथे तालिबानचा अफगाणिस्तानवरील कब्जा आणि आणि तालिबानकडून करण्यात येणार हिंसाचार याची चिंता भेडसावत आहे तिथे इलॉन मस्कला मात्र वेगळीच चिंता सतावत आहे.
टेस्लाचा मालक आणि जगात अनेक नवनवीन शोध लावणाऱ्या व्यक्तींपैकी एक अशी ओळख असलेला शास्त्रज्ञ आणि अब्जाधीश एलोन मास्क याला तालिबानच्या एका फोटोमध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांनी मास्क घातलेला नाही याचीच चिंता आहे. त्याचबरोबर यांना डेल्टा व्हेरियंटबद्दल माहिती तरी आहे का असा सवालही त्याने केला आहे.
— Elon Musk (@elonmusk) August 20, 2021
दरम्यान अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हिंसाचाराला सुरवात केली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने घरोघरी जाऊन लोकांची हत्या करायला सुरवात केली आहे. शोधून शोधून पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी तालिबानचा दहशतवादी काबूलमध्ये फिरत आहेत. कालच डीडब्ल्यू न्यूज नावाच्या एका जर्मन वृत्तवाहिनीच्या एक पत्रकाराला गंभीर इजा पोचवली तर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्याही केली. त्याव्यतिरिक्त अजून एका नातेवाईकाला गंभीर दुखापती झाली. या घटनेनंतर या पत्रकाराने जर्मनीला पलायन केले. त्याचबरोबर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील व्यक्तींनीही जर्मनीत यशस्वीपणे पलायन केले आहे.
हे ही वाचा:
ओणम म्हणजे काय? कसा साजरा करतात?
भारतात लवकरच ईव्ही चार्जिंगचे जाळे
पाकिस्तानच्या ग्वादारमध्ये बॉम्बहल्ला, चीनचे ८ नागरिक ठार
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तालिबानच्या अनेक अनन्वित छळांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हिंदू, शीख यांच्यासारखे अल्पसंख्यांक तसेच महिला आणि मुलांना सर्वाधिक जाच सहन करावा लागत आहे. यामुळे अफगाण महिला आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काय टोकाची पावलं उचलावी लागत आहेत, हे पाहून कोणत्याही सहृदय व्यक्तीला नक्कीच वेदना होतील.