अब्जाधीश उद्योगपती आणि नुकताच ट्विटरचा ताबा घेतलेले एलन मस्क लवकरच ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा देणार आहेत. तशी घोषणा त्यांनी केली असून त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडला असल्याचेही जाहीर केले आहे.
अब्जाधीश एलन मस्क यांनी गुरुवारी ट्वीट करून ट्विटरचे सीईओपद आपण सोडत असल्याचे जाहीर केले आणि नव्या सीईओची निवड केल्याचे स्पष्ट केले. त्यांनी नव्या सीईओचे नाव जाहीर केले नाही. मात्र, नवी सीईओ ही एक महिला असेल, असे संकेत मस्क यांनी दिले आहेत. गुरुवारी मस्क यांनी ट्वीट करत ही घोषणा केली. ‘मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की, मी नव्या सीईओची निवड केली आहे. ती व्यक्ती सहा आठवड्यांत ही जबाबदारी सांभाळेल. मी सीईओ पदाचा राजीनामा देईन आणि ट्विटरचा कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य प्रौद्योगिक अधिकारी म्हणून काम करेन.’ त्यामुळे नव्या व्यक्तीची उत्तराधिकारी म्हणून निवड केल्यानंतरही एलन मस्क ट्विटरसंदर्भातील निर्णय घेणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. ते यापुढे कंपनीचे प्रौद्योगिक अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यामुळे ते कंपनीच्या उत्पादन आणि सॉफ्टवेअरसंदर्भातील बाबींवर लक्ष ठेवतील.
Excited to announce that I’ve hired a new CEO for X/Twitter. She will be starting in ~6 weeks!
My role will transition to being exec chair & CTO, overseeing product, software & sysops.
— Elon Musk (@elonmusk) May 11, 2023
मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर सुरुवातीलाच मला ट्विटरच्या सर्वोच्च पदावर राहण्याची मनीषा नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र कंपनीसाठी देण्यात येणारा वेळ कमी करण्याची त्यांची योजना होती, हे देखील त्यांनी म्हटले होते. याच योजनेनुसार, ते पुढील मार्गक्रमणा करत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
बॉडी बिल्डर संकल्प भाटकरला आईच्या हत्येप्रकरणी अटक
शिक्षकांनी लावला डोक्याला हात, उत्तर पत्रिकेत ‘पुष्पा’चे संवाद
रक्ताच्या पिशव्या गरजूंपर्यंत उडत गेल्या!
एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ट्विटरच्या वापरकर्त्यांना मिळणारी ‘विश्वासार्हते’चे मानांकन दर्शवणारी ‘ब्लू टिक’ ही सशुल्क केली. त्याला अनेकांनी विरोध केला. मुदत संपल्यानंतर अनेक सेलिब्रेटी, उद्योगपतींची ही ‘ब्लू टिक’ गायब झाली होती. मात्र अनेकांनी पैसे भरल्यानंतर ही ‘ब्लू टिक’ त्यांना परत मिळाली.