अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान इलॉन मस्क यांनी आपण मोदींचे चाहते असल्याचे म्हटले आणि टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त करत पुढील वर्षी ते देशाला भेट देणार असल्याचे जाहीर केले. मस्क यांनी स्वतःला ‘मोदींचे चाहते’ही म्हटले. त्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ‘मी भारताच्या भविष्याबद्दल कमालीचा उत्साही आहे. मला वाटते की, जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक क्षमता आहे,’ असे ते म्हणाले.
“मोदींना भारतासाठी खरोखरच चांगले कार्य करायचे आहे. त्यांना नवीन कंपन्यांसाठी द्वारे उघडायची आहेत, त्यांना समर्थन द्यायचे आहे. मी मोदींचा चाहता आहे,’ असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीचे वर्णन करताना त्यांनी ‘उत्कृष्ट’ अशा शब्दात वर्णन केले. तसेच, प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला लवकरच भारतात गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी यापूर्वी देशात गुंतवणुकीसाठी अतिरिक्त सवलती मागितल्या होत्या, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनीही ट्वीट करून आमची भेट चांगली झाल्याचे म्हटले आहे. ‘आमच्यात उर्जेपासून अध्यात्मापर्यंतच्या मुद्द्यांवर बहुआयामी चर्चा झाली,’ असे त्यांनी लिहिले आहे.
Great conversation with @NarendraModi https://t.co/UYpRvNywHb
— Elon Musk (@elonmusk) June 21, 2023
भारतातील गुंतवणुकीबाबतही मस्क यांनी काही बाबी सांगितल्या. ‘पंतप्रधानांना खरोखरच भारताची काळजी आहे. ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत. आम्हीही ते करू इच्छितो. त्यासाठी केवळ योग्य वेळ साधायची आहे,’ असे ते म्हणाले. स्पेसएक्सची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा भारतात आणण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे जिथे इंटरनेट नाही, अशा ग्रामीण भागातील लोकांना मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
योगदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतून संदेश
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ‘बोंबाबोंब’
तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !
देवेंद्र फडणवीस म्हणाले; बंजारा समाजाच्या विकासासाठी सरकार सदैव पाठीशी !
पंतप्रधान मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ नील डी ग्रास टायसन, प्राध्यापक नसिम निकोलस तालेब, लेखक रॉबर्ट थर्मन आणि गुंतवणूकदार रे डालियो यांचीही भेट घेतली.