एलोन मस्क यांनी युक्रेनला केली ‘ही’ मदत

एलोन मस्क यांनी युक्रेनला केली ‘ही’ मदत

रशियाच्या हल्ल्याचा सामना करत असलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क पुढे सरसावले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत. हवाई हल्ले आणि बॉम्बस्फोटांमुळे देशातील अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे, त्यात इंटरनेट देखील एक आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे पहिले उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ट्विटरच्या माध्यमातून इलॉन मस्क यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर एलोन मस्क यांनी युक्रेनला सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याचे मान्य केले.

रशियाकडून हल्ले होत असलेल्या युक्रेनमध्ये बॉम्बस्फोट आणि स्फोटांसोबतच सायबर हल्लेही होत आहेत. देशातील इंटरनेट सेवांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे शनिवारी युक्रेनचे व्हॉईस पंतप्रधान आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी इलॉन मस्क यांना ट्विटर पोस्टद्वारे मदतीचे आवाहन केले होते.

सगळे युक्रेनला मदत करण्यासाठी सरसावत आहेत. मात्र, रशियावर अनेक निर्बंध लावले जात आहेत. फेसबुक, युट्युब आणि ट्विटरने रशियाच्या जाहिरातीवर बंदी घातली आहे. तसेच गुगलनेही युक्रेनच्या विनंतीवरून युक्रेनमध्ये RT अँपवर बंदी घातली आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने रशियाचे अध्यक्ष वाल्मीदिर पुतीन यांना मानद अध्यक्षपदावरून निलंबित केले आहे. बेल्जीयमने रशियन एअरलाइन्ससाठी हवाई हद्द बंद केली आहे.

हे ही वाचा:

भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

‘परदेशात गेलेला आपला वारसा परत आणणे ही आपली जबाबदारी’

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू

‘ऑपरेशन गंगा’चे तिसरे विमान भारतात दाखल

रशिया युक्रेन आक्रमण सुरू झाल्यापासून रशियाने सुमारे ४ हजार ३०० सैनिक आणि १४६ रणगाडे गमावले आहेत. असे युक्रेनचे उप संरक्षण मंत्र्यांनी दावा केला आहे. रशियाने युक्रेनियन तेल आणि वायू सुविधांवर हल्ला केला आहे. रशियाच्या आक्रमणात तीन मुलांसह किमान १९८ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version