एलॉन मस्क यांनी गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी ट्विटर करार पूर्ण केला असून ट्विटरचा ताबा घेतला आहे. मात्र, कंपनीची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांना मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चा असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे.
Elon Musk has completed his $44 billion deal for Twitter. The company's CEO and CFO were terminated and escorted out of headquarters https://t.co/nsktVzuCtn pic.twitter.com/SBWTIzqPnx
— Reuters (@Reuters) October 28, 2022
दरम्यान, गुरुवारी एलॉन मस्क यांनी ट्वीट करत ट्विटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. “भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल मंच असणे आवश्यक आहे. त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,” अशा आशयाचे ट्वीट मस्क यांनी केले होते.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट तर कुलगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची केली हत्या
‘हिजाब’ प्रकरणात शैक्षणिक संस्थेचे नियम सर्वोच्च
अकासा एअरचे विमान १९०० फूट उंचीवर पक्ष्याला धडकले
एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल ट्विटर गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ट्विटर आणि मस्क यांच्यातील विक्रीचा करार फिस्कटला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थेट न्यायालयात गेले. त्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्वटर पुन्हा विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. अखेर त्यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली. त्यानंतर मस्क यांनी त्याचं ट्विटर प्रोफाइल देखील बदललं असून प्रोफाइलमध्ये बदल करुन त्यांनी ‘ट्विट चीफ’ असं लिहिले आहे.