23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियाबनावट खात्यांमुळे एलन मस्क यांनी ट्विटरचा करार केला रद्द

बनावट खात्यांमुळे एलन मस्क यांनी ट्विटरचा करार केला रद्द

Google News Follow

Related

गेल्या अनेक महिन्यांपासून ट्विटर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे खूपच चर्चेत आहेत. मस्क आणि ट्विटर डील हा हाय-व्होल्टेज ड्रामापेक्षा कमी नव्हता. गेल्या तीन महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्विटरचा करार चर्चेत राहिलाय. आधी ट्विटरच्या किंमतीबद्दल सीईओसोबत मतभेद झाले नंतर ट्विटरवर फेक अकाउंट किती यावरून पुन्हा ट्विटर आणि मस्क यांच्याच मतभेद सुरु होते.अखेर या वादावरून एलन मस्क यांनी ट्विटरचा करार रद्द केलाय.

काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटरचे ९ पूर्णांक २ टक्के शेअर्स खरेदी केले आणि त्याच वेळी ते ट्विटरचे ७३ दशलक्ष किमतीचे ट्विटरचे मालक झाले. त्यांनतर ट्विटरच्या व्यवस्थापनाने मस्क यांना ट्विटरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये सामील होण्यास सांगितलं. मस्क यांनी त्यास नकार दिला आणि ट्विटर खरेदी करण्याची बोली लावली. मग होय नाही असं होत अखेर एप्रिलमध्ये एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरला ट्विटरचा करार केला. मात्र करार झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यात एलन मस्क यांनी हा करार रद्द केलाय. करार रद्दची बातमी येताच ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालीय.

ट्विटरचा करार रद्द करण्याच कारण म्हणजे, ट्विटरवर असेलली फेक अकाउंट्स. जेव्हा ट्विटर आणि एलन मस्क यांच्या करार होत होता तेव्हा ट्विटरने मस्क यांना सांगितलेले की, ट्विटरवर फक्त ५ टक्के फेक अकाउंट्स आहेत. असं सगळं करारात बोलणं झालं आणि त्यांचा करार निश्चित झाला. करार निश्चित झाल्यानंतर कंपनीचं ऑडिट होणं गजरेच असत. जेव्हा ट्विटर कंपनीचं ऑडिट झालं तेव्हा समोर आलं की, ट्विटरवर ५ टक्के नाही तर २० टक्के फेक अकाउंट्स आहेत. त्यांनतर मे महिन्यात एलन मस्क यांनी हा करार फेक अकाउंट्सच्या करणावरून स्थगित केल्याचं सांगितलं होत. ट्विटरवर जी फेक अकाऊंट्स आहेत त्याची पूर्णतः माहिती ट्विटर देऊ न शकल्याने अखेर मस्क यांनी ट्विटरचा ४४ अब्ज डॉलरचा करार मागे घेतलाय.

पण प्रश्न असा येतो फेक अकॉउंटसचा एवढा मोठा काय परिणाम होतो ज्यामुळे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीलाही हा करार रद्द करावा लागलाय. तर ट्विटरवर कोणीही बिनधास्त आपले विचार मांडू शकत. ट्विटरवर सर्वात जास्त राजकीय नेते सक्रिय असतात आणि याचाच फायदा ट्रॉलिंग साठी केला जातो. राजकीय नेत्यांवर किंवा ख्यातमान व्यक्तींवर खोटे नाटे आरोप करणं किंवा बदनामी करणं. राजकीय हेतूने भांडण लावणं, खोट्या बातम्या किंवा समाजात अविश्वास निर्माण करणं यासाठी फेक अकाउंट्सचा जास्तकरून वापर केला जातो. फक्त ट्विटरवरच नाही तर सर्रास सोशल मीडियावर फेक अकाउंट्स असतात. काही दिवसांपूर्वीच फेसबुकला असं आढळून आलेलं अब्जावधी अकाउंट्स फेसबुकवर फेक आहेत. २०२० मध्ये ट्विटरने जवळपास ७० दशलक्ष फेक अकाउंट्स निलंबित केलेली. ट्विटर सर्वात जास्त यूएसमध्ये वापरलं जात.

२०२१ च्या आकडेवारीनुसार जगातील ट्विटरवर ४०० मिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. तर भारतातील जवळपास २५ मिलियन लोक ट्विटर वापरतात. या आकडेवारीनुसार बघितलं तर २० टक्यानुसार जवळपास ८० मिलियन फेक अकाउंट्स ट्विटरवर आहेत. त्यामुळे हा ट्विटरचा करार करताना मस्क यांना पारदर्शकता हवी होती पण मस्क यांच्या प्रश्नांची ट्विटर उत्तर देऊ न शकल्याने त्यांनी हा करार रद्द केला. पण हा करार रद्द केल्याने ट्विटरचे अध्यक्ष कायदेशीर कारवाई करणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा