एलॉन मस्क वॉश बेसिन घेऊन पोहचले ट्विटर कार्यालयात

टेस्ला मोटर्सचे सीईओ एलॉन मस्क यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एलॉन मस्क वॉश बेसिन घेऊन पोहचले ट्विटर कार्यालयात

टेस्ला मोटर्सचे सीईओ एलॉन मस्क यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या एलॉन मस्क हे ट्विटर डिलमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, त्यांचा ट्विटर कार्यालयामधील एक व्हिडीओ त्यांनी स्वतः शेअर केला आहे.

एलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की हातात वॉश बेसिन घेऊन एलन मस्क थेट ट्विटरच्या ऑफिसमध्ये पोहचले आहेत. त्यांनी केलेली अनोखी एन्ट्री पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच चर्चांना उधाण देखील आले आहे. त्यांनी अशी एन्ट्री का घेतली असावी यावर चर्चा देखील सुरू झाली आहे.

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ट्विटर आणि मस्क यांच्यातील विक्रीचा करार फिस्कटला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थेट न्यायालयात गेले. त्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्वटर पुन्हा विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे.

हे ही वाचा:

कॅनडामध्ये भारतीयांना मारहाण करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना भारतीयांकडून चोख उत्तर

महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयची दिवाळीभेट, आता पुरुषांएवढेच मानधन

चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

मस्क यांनी बुधवार, २६ जानेवारी रोजी ट्विटर मुख्यालयाला भेट दिली. यावेळी हातात सिंक घेऊन मुख्यालयात फिरत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. व्हिडिओला त्यांनी ‘ट्विटर हेडक्वार्टरमध्ये प्रवेश, लेट दॅट सिंक इन!’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओ नंतर मस्क यांना विविध प्रतिक्रिया वापरकर्ते देत आहेत.

Exit mobile version