जॅक डोर्सी यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जागी सीईओ म्हणून भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीयांचा दबदबा वाढत चालला आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोबनंतर आता ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाली आहे.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला’
पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?
ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार
भारतीयांना प्रमुख पदांच्या जबाबदारीची धुरा यशस्वीपणे सांभाळताना पाहून टेस्लाचे एलन मस्क यांनी खास ट्विट केले आहे. ट्विटमध्ये एलन मस्क यांनी भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला फायदा होत आहे. असे ट्विट एलन मस्क यांनी सोमवारी केले आहे.
USA benefits greatly from Indian talent!
— Elon Musk (@elonmusk) November 29, 2021
एलन मस्क यांनी म्हटलं की, भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला फायदा होत आहे. एलन मस्क यांनी स्ट्रीपचे सह- संस्थापक आणि सीईओ पॅट्रिक कोलिसन यांच्या ट्विटला रिप्लाय देताना अशी प्रतिक्रिया दिली आहे. पॅट्रिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोब, आय़बीएम, पालो अल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ हे भारतीय वंशाचे आहेत. तंत्रज्ञान जगतात भारतीयांचे हे यश पाहणे खूपच सुंदर आहे, असे ट्विट केले आहे.