ब्रिटनच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचे गुरुवारी, ८ सप्टेंबरला वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. जगातील पंधरा देशांची राणी असलेल्या दुसऱ्या एलिझाबेथ आपल्या मागे अब्जावधींची संपत्ती सोडून गेल्या आहेत.
दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या एकूण संपत्तीबाबत अनेक अहवालात वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. फॉर्च्युनच्या दाव्यानुसार, एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या मागे पाचशे मिलियन डॉलरची संपत्ती सोडली आहे. भारतीय रुपयांनुसार जवळपास ४० अब्ज रुपयांची संपत्ती त्यांच्या पाठीमागे आहे. ही संपत्ती तिसरे प्रिन्स चार्ल्स यांना राजा बनल्यानंतर वारसा हक्काने मिळणार आहे.
ब्रिटनच्या या शाही घराण्याला करदात्यांकडून मोठी रक्कम मिळते. या मिळणाऱ्या रकमेला सॉवरेन ग्रँट असे म्हटले जाते. या ग्रँटची सुरुवात किंग जॉर्ज तृतीय यांच्या काळात सुरु झाली होती. त्यावेळी त्यांनी संसदेत एक करार मंजूर केला होता. ज्यामध्ये त्यांनी स्वत:च्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना फंड मिळण्याची तजवीज त्यांनी करून ठेवली होती. या कराराला २०१२ च्या आधी सिविल लिस्ट नावाने ओखळले जायचे. २०१२ नंतर सिविल लिस्टला सोवरेन ग्रँटमध्ये रूपांतर करण्यात आले होते. २०२१- २२ मध्ये सॉवरेन ग्रँटची रक्कम ८६ मिलियन पाउंडपेक्षा जास्त ठरवण्यात आली होती. ही सॉवरेन ग्रँटची रक्कम अधिकृत प्रवास, संपत्तीची देखरेख आणि राणीच्या पॅलेसच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आली होती. ब्रिटनच्या दुसऱ्या राणी एलिझाबेथ या जगातील एकमेव अशा व्यक्ती होत्या, ज्या जगात पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय प्रवास करू शकत होत्या.
फोर्ब्सच्या अहवालानुसार ब्रिटनच्या शाही घराण्याची अचल संपत्ती २०२१ मध्ये जवळपास २८ बिलियन डॉलर होती. ही अचल संपत्ती कधीही विकली जाऊ शकत नाही.
ब्रिटनच्या शाही घराण्याची अचल संपत्ती पुढीलप्रमाणे:
द क्राउन इस्टेट १९.५ बिलियन डॉलर
बकिंघम पॅलेस ४.९ बिलियन डॉलर
द डची ऑफ कॉर्नवाल १.३ बिलियन डॉलर
द डची ऑफ लॅकेस्टर ७४८ मिलियन डॉलर
केंसिंग्टन पॅलेस ६३० मिलियन डॉलर
स्कॉटलँडचा क्राउन इस्टेट ५९२ मिलियन डॉलर
हे ही वाचा:
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय
पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण
अमरावतीमधील ‘ती’ मुलगी जबाबात म्हणाली…
या अचल संपत्तीसह पाचशे मिलियन डॉलरची संपूर्ण संपत्ती ही प्रिन्स चार्ल्स या नव्या राजाकडे जाणार आहे. शाही परिवाराच्या नियमानुसार, दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर ७३ वर्षीय तिसरे प्रिन्स चार्ल्स यांना राजा घोषित करण्यात आले.