एलेना रिबाकिना ठरली विम्बल्डनची सर्वात तरुण चॅम्पियन

एलेना रिबाकिना ठरली विम्बल्डनची सर्वात तरुण चॅम्पियन

ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली कझाक खेळाडू

कझाकिस्तानची टेनिसपटू एलेना रिबाकिना हिने विम्बल्डन २०२२ मध्ये महिला एकेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. शनिवार, ९ जुलै रोजी झालेल्या अंतिम सामन्यात एलेना रिबाकीनाने ट्युनिशियाच्या ओन्स जेबूरचा ३-६, ६-२, ६-२ असा पराभव केला. रिबाकिनाच्या कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले आहे.

पेट्रा क्विटोवानंतर रिबाकिना विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. पहिला सेट जिंकल्यानंतर जेबुरला चांगला खेळ करता आला नाही. नंतरच्या दोन्ही सेटमध्ये तिला रिबाकिनाच्या आव्हानाचा सामना करता आला नाही. ट्युनिशियाची २७ वर्षीय जेबुर ही विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पोहचणारी, अरब आणि आफ्रिकन देशांतील पहिली महिला ठरली होती.

हे ही वाचा:

गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री

राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा…म्हणून पंतप्रधान मोदींची भेट

श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा; आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघेंचं खासगी घर पेटवले

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा; राज्याच्या अडचणी दूर होऊन विकासासाठी साकडं

दरम्यान, कझाकिस्तानच्या या २३ वर्षीय खेळाडूने गतवर्षी चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदा मात्र तिने थेट विजेतेपदालाच गवसणी घातली आहे. सोबतच ती विम्बल्डनची सर्वात तरुण चॅम्पियन देखील ठरली आहे. विशेष म्हणजे, कझाकिस्तानच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने यापूर्वी एकेरी गटात कोणतेही विजेतेपद जिंकले नव्हते. महिला एकेरीत ग्रॅण्डस्लॅम जेतेपद जिंकणारी रिबाकिनाने कझाकिस्तानची पहिलीच टेनिसपटू ठरली आहे.

Exit mobile version