सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू

युरोपियन देश असलेल्या सर्बियामध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू

युरोपियन देश असलेल्या सर्बियामध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. सर्बियाची राजधानी बेलग्रेडच्या दक्षिणेला सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्बियन शहराजवळ ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेत आठ जण ठार झाले आहेत. तर १० जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांमधील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. हल्लेखोराने चालत्या वाहनातून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस सध्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं

दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले

पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!

संरक्षण संशोधन तथा डीआरडीओचा शास्त्रज्ञ अडकला हनी ट्रॅपमध्ये

दोन दिवासांपूर्वीच बेलग्रेडमध्ये एका १३ वर्षीय मुलाने शाळेत गोळीबार केला होता. आपल्या वडिलांच्या बंदुका घेऊन शाळेत आलेल्या या मुलाने केलेल्या गोळीबारात आठ मुले आणि एक सुरक्षा रक्षक ठार झाल्याची घटना घडली होती. तर अनेकजण जबर जखमी झाले आहेत. त्यानंतर संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version