शिकागोजवळ तीन ठिकाणी आठ जणांची गोळ्या झाडून हत्या

शिकागोजवळ तीन ठिकाणी आठ जणांची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेजवळील शिकागोजवळच्या उपनगरात एका व्यक्तीने रविवारपासून आठ जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. जोलिएट आणि विल कौंटीजचे पोलिस या हत्येमागील हेतूचा शोध घेत आहेत. आरोपी या सर्व मृत झालेल्या व्यक्तींना ओळखत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.

हे सर्व मृतदेह रविवारी आणि सोमवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी दिली. ही व्यक्ती सशस्त्र असून धोकादायक ठरू शकते, असे सांगून सोशल मीडियावरूनही लोकांना सतर्क राहण्याचे इशारे पोलिसांकडून देण्यात आले होते.

विल कौंटी येथील एका घरात रववारी एकाचा मृतदेह आढळला. तर, अन्य सात मृतदेह जोलिएट येथील दोन घरांत आढळले. या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी अमेरिकेची एफबीआय संस्थाही मैदानात उतरली आहे. ती स्थानिक पोलिसांना सर्वतोपरी मदत करत आहे. एका पोलिसाने तर त्याच्या कारकिर्दीतील गेल्या २९ वर्षांतील हे सर्वांत भयानक कृत्य असल्याचे नमूद केले आहे.

रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिस तपास करताना ते एका घराजवळ पोहोचले. मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी त्या घराशी संबंधित दुसऱ्या घरात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तिथे मृतदेह आढळले. या सर्वांची हत्या नेमकी कधी झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत समजू शकेल.

हे ही वाचा:

पीएम केअर्स फंडची माहिती उघड करण्याचे निर्देश देणारा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून रद्द!

एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य

येमेनमधील हौथी तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हवाईहल्ले!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

मृत झालेल्या सर्व व्यक्ती एका कुटुंबातील होत्या, असे पोलिसांनी सांगितले. मात्र मारेकरीही कुटुंबातलाच एक आहे का, याबाबत काहीही सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. मात्र मारेकरी त्यांना ओळखत असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. पोलिसांनी या प्रकरणी संशयिताचे आणि त्याच्या गाडीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

Exit mobile version