नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१५ मध्ये ते पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले होते. आगामी दौरा राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचा तिसरा भारत दौरा असेल .
भारताला कोणत्याही देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण देता आले असते. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेल्या भारताने अशा महत्त्वाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अल सिसी यांची निवड का केली असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. कोविड १९ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत इजिप्त जवळजवळ दिवाळखोर झाल्याचे दिसून आले आहे. एकूण विदेशी कर्ज १७० अब्ज डॉलर्स आहे आणि चलनवाढीचा दर सुमारे २५% आहे.
आखाती देशांमध्ये चांगले स्थान मिळवणारा इजिप्त सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये इजिप्शियन चलन पौंडचे निम्मे मूल्य गमावले आहे. पण भारताने आपले मन मोठे करत जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या इजिप्तला प्रजासत्ताक दिनानिमित्त आमंत्रित केले आहे. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास पाहिला तर प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इजिप्तच्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची पहिलीच वेळ आहे. प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवड होणे हाही त्यांच्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे.
हे ही वाचा:
मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल-सिसी आज हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही देशांदरम्यान रुपयाच्या चलनात चलनात व्यवहार करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. इजिप्तची सध्याची बिकट आर्थिक स्थिती आणि घातलेला परकीय चलनाचा साठा लक्षात घेता दोन्ही देशांमध्ये रुपयाच्या चलनात व्यवहार करणे त्याच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. द्विपक्षीय व्यापारासोबतच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावरही चर्चा होणार आहे.
.