पाकिस्तान सध्या दिवाळखोरीकडे जात असताना आता इजिप्तही त्याच मार्गाने जात असल्याचे चित्र आहे. तिथेही जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून तीन पोती तांदूळ, दोन लिटर दूध आणि एक लिटर तेल यापलीकडे जास्त सामान खरेदी करू शकत नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.
पण ही अवस्था होण्यामागे कारण समोर आले आहे ते शाळा, हॉस्पिटल आणि पायाभूत सुविधांपेक्षा मोठ्या प्रमाणावर पैसा हा मशिदींच्या निर्माणासाठी खर्च करण्यात आला. त्यामुळे लोकांनीही आता सरकारच्या या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इजिप्त सरकारच्या सेंट्रल एजन्सी फॉर पब्लिक मोबिलायझेशन अँड स्टॅटिस्टिकच्या अनुसार नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत नोव्हेंबर २०२२ला चलनफुगवट्याचा दर ६.२ टक्क्यांहून वाढून तो १९.२ टक्के इतका झाला आहे. इजिप्तमधील अल कुबुद जिल्ह्यातील एका २० वर्षीय मोहम्मद अब्दो याने सांगितले की, घराच्या बाल्कनीतून बाहेर पाहिले तर पाच वेगवेगळ्या मशिदींमधून अजानचा आवाज येत असतो.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून ‘सामना’मध्ये पोटदुखी
रायगड अपघातात चार वर्षीय मूल आश्चर्यकारकरित्या बचावले
मविआने रचलेल्या उद्योगांच्या विटा आहेत कुठे ?
युक्रेनमध्ये हेलिकॉप्टरला अपघात, गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू
या मशिदींसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी पैसा खर्च करण्यात आला आहे. इजिप्तच्या धार्मिक मंत्रालयाचे मंत्री मोहम्मद मुख्तार गोमा यांनी २०२०मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, देशात १ लाख ४० हजार मशिदी आहेत. त्यात एक लाख मोठ्या मशिदी आहेत. मंत्रालयाच्या अहवालानुसार राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतह अल यांच्या कार्यकाळात ९६०० मशिदींची डागडुजी करण्यात आली. त्यासाठी पैसा खर्च करण्यात आला. त्यावर ४० कोटी डॉलर खर्च करण्यात आले आहेत. इजिप्तमधील सरासरी वेतन प्रतिमहिना २१९ डॉलर इतके आहे. अरब राष्ट्रांमध्ये हे वेतन सर्वात कमी आहे.