पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!

पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!

‘ताक फुंकून पिणे’ अशी एक मराठीत म्हण आहे. एखादी गोष्ट करताना सावधगिरी बाळगण्यासाठी या म्हणीचा वापर केला जातो. याच म्हणीप्रमाणे पाकला आता चहा बद्दल करावे लागले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आली आहे. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान अनेक गोष्टींची आयात बंद करत आहे. त्यामुळेच पाकिस्तनाने सध्या त्यांच्या नागरिकांना चहा कमी पिण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानात घटत चाललेल्या परकीय गंगाजळीतून चहा आयातीसाठी लागणारे शुल्क कमी होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ८३.८८ अब्ज रुपयांच्या चहाचे सेवन केले आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असताना एवढे पैसे चहावर खर्च होणं हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी परवडणारे नाही. त्यामुळे पाकिस्तानचे केंद्रीय नियोजनमंत्री एहसान इक्बाल यांनी देशवासीयांना चहा कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, जगातील सर्वाधिक चहा आयात करणाऱ्या देशांत पाकिस्तानचा समावेश होतो. चहा आयात करण्यासाठी पाकिस्तानला कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘मी देशवासीयांना असे आवाहन करतो, की दिवसातून एक-दोन कप चहा कमी प्या. कारण आपल्याला कर्ज करून चहा आयात करावा लागतो.’’

हे ही वाचा:

लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी

अग्निपथ योजनेसाठी केंद्र सरकारने वाढवली वयोमर्यादा

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार

तसेच ऊर्जा बचतीसाठीसुद्धा पाकिस्तानने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. इक्बाल म्हणाले की, व्यापाऱ्यांनी रात्री साडेआठला बाजारपेठ बंद कराव्यात. त्यामुळे इंधन आयातीसाठीचे शुल्क कमी करण्यास हातभार लागेल. यावेळी इक्बाल यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था श्रीलंकेसारखी होईल, अशी भीती इक्बाल यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या नागरिकांनी इक्बाल यांच्या चहा कमी पिण्याच्या निर्यणयाची खिल्ली उडवली आहे.

Exit mobile version