इराणने आपले नवे राष्ट्रपती निवडले आहेत. इब्राहिम रईसी यांची इराणचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. रईसी हे कट्टरतावादी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. शनिवार, १९ जून रोजी रईसी यांनी आपला विजय नोंदवला असून निवडणुकीतील त्यांचा विजय हा एक घवघवीत विजय ठरला आहे.
इब्राहिम रईसी यांच्या या निवडीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी रईसी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन. भारत आणि इराणमधील बंध अधिक दृढ होण्यासाठी त्यांच्या बरोबर काम करता येईल याची मला खात्री आहे”, असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
Congratulations to His Excellency Ebrahim Raisi on his election as President of the Islamic Republic of Iran. I look forward to working with him to further strengthen the warm ties between India and Iran.
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2021
हे ही वाचा :
शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे
लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी
भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!
इराणचे १३ व्या राष्ट्रपती पदासाठी १८ जून रोजी निवडणूक पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सईद जलीली, इब्राहिम रईसी, अलीरेझा झाकानी, सैय्यद अमीर हुसेनी हशेमी, मोहसेन मेहरालीझादेह, मोहसेन रेझाई, आणि अब्दोल नासेर हेमाटी अशा सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ३ जणांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
या वेळेच्या इराणच्या राष्ट्रपती निवडणुकीत खूप कमी मतदान पाहायला मिळाले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी आवाहन केल्यानंतरही मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या जवळपास होती. आजवरच्या इराणियन इतिहासातील ही सर्वात कमी मतदानाची टक्केवारी आहे.