काठमांडूनंतर आता गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत . या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी होती.या भूकंपाची तीव्रता सौम्य होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार गुजरातमधील सुरतपासून ६१ किमी अंतरावर हा भूकंप झाला असून या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या भूकंपाची खोली भूगर्भात ७ किमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात गुजरातमधील कच्छ भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ३.२ इतकी मोजली गेली. गांधी नगरच्या सिस्मिक रिसर्च इन्स्टिट्यूटने सांगितले की, कच्छमध्ये संध्याकाळी ७.४३ च्या सुमारास भूकंप झाला. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी किंवा वित्तहानी झाली नाही.
यापूर्वी, १९ ऑक्टोबर रोजी शेजारच्या नेपाळमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्याचे धक्के बिहारच्या अनेक भागात जाणवले होते. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी मुझफ्फरपूर, सीतामढीसह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप दुपारी ३.४५ वाजता झाला, त्याचा केंद्रबिंदू काठमांडूपासून ५३ किमी पूर्वेला आणि १० किमी खोलीवर होता. पाटणासह इतर अनेक ठिकाणी लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
अहवालानुसार, पाटणा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. पाटणासह राज्याच्या इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हवामानतज्ज्ञ म्हणाले की, पाटणा येथे फक्त भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत, नेपाळलगतच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत.