देशात भूकंपाचे धक्के बसणे संपलेले नाही. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये पहाटे ५.४० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घाबरून घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.४० नोंदवण्यात आली. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.जिल्हादंडाधिकारी अभिषेक रुहेला यांनी आपत्ती व्यवस्थापनाला जिल्ह्यातील सर्व तहसीलांमधून जीवित व मालमत्तेच्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत .
भूकंपाचा केंद्रबिंदू जिल्हा मुख्यालयाजवळ होता. यापूर्वी ५ मार्च रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याचा केंद्रबिंदू उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयाजवळ होता.उत्तरकाशी जिल्हा मुख्यालय आणि परिसरात गुरुवारी (आज) सकाळी भूकंपाच्या धक्क्याने लोक झोपेतून जागे झाले. रिश्टर स्केलवर तिची तीव्रता तीन होती, त्याचा केंद्रबिंदू उत्तरकाशीतील मांडो जंगलात जमिनीपासून पाच किमी खाली होता.
या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या या वारंवार धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गेल्या मार्च महिन्यापासून भूकंपाचे धक्के येत आहेत. ४ मार्चच्या रात्री उशिरा येथे भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते . ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.५ मोजण्यात आली. त्याचे केंद्र भटवाडी तहसील अंतर्गत सिरोरच्या जंगलात होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानचा जीडीपी आणखी आटण्याची भीती
सर्वशक्तिमान, संगीतज्ञानमहंता हनुमान
मुंबईतील कोरोनाने ओलांडला २०० रुग्णांचा टप्पा
मारहाण प्रकरणातील महिला गर्भवती नसल्याचा नारायण राणेंचा दावा
लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत . भूकंपाच्या धक्क्यांनंतर घाबरून लोक घरातून बाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी होती. ही तीव्रता थोडी जास्त राहिल्यास परिस्थिती गंभीर झाली असती असे असे सांगण्यात येत आहे. सुदैवाने भूकंपाचे धक्के अतिशय सौम्य होते. सध्या या भूकंपांमुळे लडाखमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.