भूकंपाच्या झटक्यांनी पूर्व, ईशान्य भारत हादरला

भूकंपाच्या झटक्यांनी पूर्व, ईशान्य भारत हादरला

आज भारतात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भारतातील पूर्वेकडील आणि ईशान्येकडील राज्यात हे भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले. शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भारताच्या पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांमधील नागरिकांना या भूकंपाच्या झटक्यांची जाणीव झाली. त्यांनी सोशल मीडियावर त्याबद्दल लिहीले आहे.

६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. या भूकंपाचे मुख्य केंद्र बांगलादेश मधील पूर्व भागातील चित्तागाँग पासून १७४ किलोमीटर अंतरावर होते. याचे झटके भारतातील म्यानमार सीमे नजीकच्या राज्यांमध्ये जाणवले. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम या राज्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

छत्रपतींच्या रायगडावर येणार राष्ट्रपती

I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला

विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

देशात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा भूकंप झाला. कलकत्ता आणि गुवाहाटीच्या अनेक भागांमध्ये जवळपास अर्ध्या मिनिटासाठी या भूकंपाचे झटके जाणवत होते.

Exit mobile version