नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार जपानच्या होन्शू बेटाच्या पूर्व किनाऱ्याला सुमारे ६ रिश्टरच्या भूकंपाचा धक्का बसला. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. त्याबरोबरच या भूकंपामुळे त्सुनामीची शक्यतादेखील वर्तवली गेलेली नाही. हा धक्का सकाळी साडे पाचच्या सुमारास बसला.
या महिन्याच्या सुरूवातीस ६.६ रिश्टरच्या भूकंपाचा धक्का बसला होता. हा धक्का जपानच्या ईशान्येकडील भागात बसला होता. जपान मिटिरॉलॉजिकल एजन्सीने (जेएमए) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र प्रशांत महासागरात मियागी भागाच्या जवळ ६० किमी खोलीवर होते. या भूकंपाचे धक्के जपानच्या उत्तर आणि पूर्व भागात बसले होते. टोकियोलासुद्धा हे धक्के बसले होते.
हे ही वाचा:
अरबी समुद्रात वादळाची निर्मिीती; महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा
अक्षय्य तृतीयेच्या मोदींनी दिल्या शुभेच्छा
नव्या कोविड रुग्णांचा आकडा ३ लाख ५० हजारापेक्षा कमी
कोरोनाविरोधात भारत सरकारने काय केले? सत्य आणि गैरसमज
जपान हा भूकंपप्रवण क्षेत्रात वसलेला देश आहे. ज्या ठिकाणी दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकींना धडकतात अशा भू-संवेदनशील क्षेत्रात जपान आहे. या भागाला रिंग ऑफ फायर या नावाने ओळखले जाते. या भागात सातत्याने भूकंप होत असतात.
११ मार्च २०११ रोजी जपानला ९ रिश्टरच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्यामुळे मोठ्या त्सुनामीची निर्मिती झाली होती. त्याबरोबरच या भूकंपामुळे जपानच्या फुकुशिमा दाईची या अणुउर्जा प्रकल्पाला धोका निर्माण झाला, आणि हा प्रकल्प बंद करावा लागला होता.