उत्तराखंड भूकंपाने हादरले

अनेक ठिकाणी जाणवले भूकंपाचे धक्के

उत्तराखंड भूकंपाने हादरले

उत्तराखंडमध्ये रविवारी सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर होती. रविवारी सकाळी ८.३३ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. कुठूनही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील चिन्यालीसौंडपासून ३५ किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. डेहराडून, मसुरीपासून उत्तरकाशीपर्यंत हे धक्के जाणवले. उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयासह दुंडा भटवाडी बरकोट नौगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.रुद्रप्रयागमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तरकाशी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जौनसरचे पर्यटन स्थळ लखामंडल आणि बोंदूर खात या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्केबसले. स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने लोक घाबरले आहेत. मात्र, कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

टिहरी जिल्ह्यातही रविवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लोक घराबाहेर पडले. डीएम अभिषेक रुहेला यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. आजपर्यंत कुठूनही जीवित व मालमत्तेची माहिती मिळालेली नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

दहशतवादी अबू हंजलाला अटक

‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

उत्तराखंड भूकंपासाठी असुरक्षित
उत्तराखंड हे भूकंपाच्या अतिसंवेदनशील झोन पाचमध्ये येते. अशा स्थितीत हिमालयातील राज्यांपैकी एक असलेले उत्तराखंड हे भूकंप-संवेदनशील राज्य असून येथे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.यापूर्वी ८ ऑक्टोबर २०२२ रो जी पिथौरागढ जिल्ह्यातील मुनसियारी भागात भूकंप झाला होता. ज्याची तीव्रता ३.९तीव्रता आणि खोली १० किमी होती. २ ऑक्टोबर २०२२ रोजी उत्तरकाशीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता २. ५रिश्टर होती.

Exit mobile version