आधी जोरदार भूकंप.. आता न्यूझीलंडमध्ये त्सुनामीची भीती

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या १० किलोमीटर आत.

आधी जोरदार भूकंप..  आता न्यूझीलंडमध्ये त्सुनामीची भीती

न्यूझीलंड गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांला भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी मोजली गेली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या १० किलोमीटर आत होता. समुद्राच्या मध्यभागी एवढा शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी आता येत्या काही दिवसांत त्सुनामी येण्याची भीती व्यक्त केली आहे.

कर्माडेक बेटावरच्या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ४१ किलोमीटर खाली होते असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही. भूकंपांतर समुद्रात लाटा उसळू लागल्याने लगेचच केरमाडेक बेटे, फिजी, न्यूझीलंड आणि टोंगा यांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला.  युएसजीएस संस्थेने न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा दिला  आहे. मात्र, न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने सुनामीचा धोका नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक निखारा निघाला…दीपक सावंत एकनाथ शिंदेंकडे

‘राम- सीता’ ३५ वर्षानंतर पुन्हा आले एकत्र…

राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?

तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?

यापूर्वी ४ मार्च रोजी याच ठिकाणी ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. त्यावेळी त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता आणि कोणतेही नुकसान झाले नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून १५२ किमी खाली होता.पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने पुढील काही तासांत भूकंपाच्या जवळ असलेल्या काही किनारी भागात समुद्राच्या पातळीत किरकोळ चढउतार होऊ शकतात.” समुद्राजवळ सतर्क रहा आणि सामान्य खबरदारी घ्या असा इशारा दिला आहे.

न्यूझीलंडमधील कर्माडेक बेटे आणि आजूबाजूच्या भागात ज्वालामुखीचा उद्रेकही होतो. या महिन्याच्या सुरुवातीला, केर्मडेक बेटांजवळ प्रशांत महासागरात ६.९ तीव्रतेचा शक्तिशाली परंतु खोल भूकंप झाला. याआधी जून २०१९ मध्ये, ७.२ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे राऊल बेटावर लहान सुनामी आली

 

Exit mobile version