इंडोनेशियाच्या मुख्य बेट जावा येथे सोमवारी झालेल्या भूकंपामुळे १६२ लोकांचा मृत्यू तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत . अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. भूकंपानंतर झालेल्या विध्वंसामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.४ इतकी होती. भूकंपामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले असून लोकांना जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली आहे.
हे ही वाचा :
श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब
‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’
हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत
कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार
इंडोनेशियाच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार भूकंपानंतर आणखी २५ धक्के नोंदवले गेले. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपामुळे काही तास वीजपुरवठा खंडित होता. अजूनही २५ लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब
‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’
हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत
कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार
मृतांची संख्या १६२वर पोहोचली आहे. २००० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. ५००० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित केंद्रात नेण्यात आले आहे. मुसळधार भूस्खलनामुळे अनेक रस्ते गाडले गेले आहेत, ते बुलडोझरच्या साहाय्याने पुन्हा खुले करण्यात येत आहेत. हे शहर डोंगराळ भाग असल्याने बचावकार्यात अडचण येत आहे. अजूनही अनेक लोक अडकले आहेत. जखमी आणि मृतांची संख्या वाढेल. वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.