प्रशांत महासागरात भूकंप, त्सुनामीचा धोका टळला

प्रशांत महासागरात भूकंप, त्सुनामीचा धोका टळला

बुधवार दिनांक, १० फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण प्रशांत (पॅसिफिक) महासागरात ७.७ रिश्टरचा भूकंप झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यु झीलँड, फिजी या देशांनी त्सुनामीपासूनच्या सावध राहण्याच्या सुचना केल्या आहेत.

बुधवारी ७.७ रिश्टरच्या भूकंपाचा झटका लॉयल्टी बेटांना बसला. त्यानंतर त्सुनामीच्या शक्यतेने त्याच्या आजूबाजूच्या ऑस्ट्रेलिया, न्यु झीलँड, फिजी या देशांनी त्सुनामीचा धोका जारी केला होता. युएस जीऑलॉजीकल एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार ७.७ रिश्टरच्या भूकंपाचे केंद्र लॉयल्टी बेटांच्या दक्षिण पूर्वेस जमिनीखाली १० किलोमीटरवर होते.

युएस स्थित पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरकडून या भागात त्सुनामीची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र त्सुनामीचा धोका काही किनाऱ्यांसाठी होता. ऑस्ट्रेलिया, न्यु झीलँड, फीजी या देशांच्या किनाऱ्यावर कमाल भरती रेखेपेक्षा पाण्याची पातळी ०.३ मीटर ते १ मीटरने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मात्र आता ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मिटिरोलऑजीने (ऑस्ट्रेलियन हवामान खाते) ट्वीट करून त्सुनामी संदर्भातील सुचना मागे घेत असल्याची माहिती दिली. त्सुनामीचा धोका रजी ऑस्ट्रेलियासाठी टळला असला तरीही आधीची त्सुनामीची सुचना मुख्य भुमीसाठी नव्हती. साऊथ वेल्सच्या पूर्व किनारा वगळता त्सुनामीचा धोका मुख्य भूमीसाठी नव्हता. त्सुनामी जरी येणार नसली तरी भूकंपाचा परिणाम म्हणून किनाऱ्याजवळ पाण्यतील प्रवाहात मोठे बदल घडू शकतात, काही प्रमाणात अधिक उंचीच्या लाटा देखील दिसू शकतात असे या खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

भूकंपाच्या पहिल्या धक्क्यानंतर ५.७ आणि ६.१ रिश्टर क्षमतेचे भूकंपानंतरचे धक्के देखील या भागाला बसले.

Exit mobile version