…आणि पृथ्वी स्वतःभोवती जोरात फिरली!

…आणि पृथ्वी स्वतःभोवती जोरात फिरली!

पृथ्वी स्वतःभोवती २४ तासात फिरते असं मानले जाते. मात्र गेल्या शुक्रवारी हीच परिस्थिती वेगळी होती. २९ जुलै रोजी २४ तास पूर्ण होण्यास १.५९ मिलिसेकंद बाकी असतानाच पृथ्वीने स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण केली होती, अशी माहिती समोर येत आहे.

१९६० नंतर पृथ्वीचा प्रथमच वेग वाढला होता, असे निदर्शनास आले. यापूर्वीही २०२० मध्ये पृथ्वीने परिवलनासाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ लागल्याची महिती मिळाली आहे. १९ जुलै २०२० रोजी पृथ्वीने सर्वात कमी वेळात पृथ्वीने प्रदक्षिणा पूर्ण केली असून, त्यामध्ये २४ तासाला १.४७ मिलिसेकंद बाकी असताना परिवलन पूर्ण झाले होते. त्याच्या नंतर पुढील वर्षी पृथ्वीचा वेग वाढतेला होता. मात्र त्या वर्षी कोणत्याही उच्चांकाची नोंद झाली नव्हती. येत्या ५० वर्षात अनेक लहान-मोठे दिवस उगवणार असे, शाश्त्रज्ञांना वाटते.

परिवलनाच्या वेगवेगळ्या वेगाचे कारण अजून समजू शकले नाहीत. परंतु पृथ्वीच्या गाभ्यातील आतील व बाह्य थरांची प्रक्रिया आणि समुद्राची भरती व ओहोटीमुळे ही फरक पडू शकतो असा अंदाज वैज्ञानिकांनी लावला.

हे ही वाचा:

गोव्यातील ‘त्या’ रेस्टॉरंटप्रकरणी स्मृती इराणी, झोईशला क्लीनचीट

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले

माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत

‘मासिक पाळी’ प्रकरणातील मुलीनेच रचला होता बनाव!

पृथ्वी स्वतःभोवती वेगाने का फिरते ?

पृथ्वी भोवती वेगाने का फिरते यांचा शोध अद्यापही वैज्ञानिकांना लागलेला नाही. मात्र हिमनद्यांवरील बर्फ वितळल्यामुळे या ग्रहांचे वस्तुमान काही प्रमाणात कमी झाले आहे. तसेच पृथ्वीच्या गर्भात अनेक हालचाली होत असतात. त्यामुळे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग कमी झाला असेल, असे मत शाश्त्रज्ञानी व्यक्त केला आहे. जर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग वाढला तर, एक दिवसाच्या तासांचा कालावधी कमी होईल. परिणाम जगभरातील घड्याळे व तंत्रज्ञानविषयक गोष्टीवर होऊ शकतो. त्यामुळे सेकंदाचा हिशोबही बिघडू शकतो.

Exit mobile version