26 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरदेश दुनियागुलामगिरीसारख्या दुष्कृत्याला प्रोत्साहन दिले त्याबद्दल क्षमा करा!

गुलामगिरीसारख्या दुष्कृत्याला प्रोत्साहन दिले त्याबद्दल क्षमा करा!

गुलामगिरीबद्दल डच राजाने मागितली नेदरलँडची माफी

Google News Follow

Related

डच वसाहतींमधून गुलामगिरीचे उच्चाटन करण्याच्या घटनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर यांनी ऐतिहासिक भाषण दिले. त्यात त्यांनी नेदरलँडवासीयांना गुलामगिरी करण्यास भाग पाडल्याबद्दल देशाच्या वतीने माफी मागितली.

 

अॅमस्टरडॅम पार्कमधील देशाच्या राष्ट्रीय गुलामगिरीच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यापूर्वी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गुलामांचा व्यापार आणि गुलामगिरीमध्ये हॉलंडने बजावलेल्या भूमिकेबद्दल गेल्या वर्षी डच पंतप्रधान मार्क रुट्ट यांनी माफी मागितली होती. गेल्या काही वर्षांत ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या कृष्णवर्णीय व्यक्तींच्या समर्थनासाठी सुरू असलेल्या मोहिमेने जोर पकडला असताना देशोदेशींचे राज्यकर्ते अशा प्रकारे आपल्या देशाने आधी केलेल्या दुष्कृत्यांबाबत माफी मागत आहेत.

 

‘मी आज तुमच्यासमोर उभा आहे. आज, मी तुमचा राजा आणि सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून तुमची माफी मागतो. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल मी आजच्या अविस्मरणीय दिनी तुमची माफी मागतो,’ असे विल्यम अलेक्झांडर यांनी यावेळी म्हटले.

 

नेदरलँडमधील गुलामगिरीबाबत ऑरेंज-नासाऊ राजघराण्याची नेमकी काय भूमिका होती, याचा शोध घेण्यासाठी एका अभ्यासगटाची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भावूक झालेल्या विल्यम अलेक्झांडर यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. अर्थात काहींनी मात्र केवळ शब्दांचे बुडबुडे नको, तशी ठाम कृती करा, असेही म्हटले आहे.

 

‘या वक्तव्याने मला समाधान वाटले आहे. परंतु मला केवळ माफी नको. त्याहून आणखी काही तरी हवे. उदा. नुकसानभरपाई सारखे काही तरी देणे गरजेचे आहे,’ अशी प्रतिक्रिया २८ वर्षीय दोएल्जा रेफोस याने दिली. ‘आपण अद्याप सर्व काही साध्य केलेले नाही,’ असेही तो म्हणाला. तर, ‘ते ऐतिहासिक भाषण देत असताना माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते,’ अशी प्रतिक्रिया माजी खासदार जॉन लीरडॅम यांनी दिली.

१ जुलै, १८६३ रोजी कॅरेबेनमधील डच वसाहतींतून गुलामगिरीचे उच्चाटन झाले. मात्र त्यानंतरही दशकभर अनेक मजुरांना शेतामध्ये बळजबरीने राबवून घेण्यात आले. या गुलामगिरीच्या उच्चाटनाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यंदाच्या वर्षी विविध कार्यक्रम होत आहेत.

हे ही वाचा:

कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुण्यात पोलिसांवर उगारला शिक्षेचा दंडुका

समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?

शिंदे-फडणवीस सरकार आता कोसळणार…

“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”

राजाच्या वंशजांनी गुलामगिरीतून आताच्या मूल्याचा विचार केल्यास ५४५ दशलक्ष युरो (५९५ दशलक्ष अमेरिकी डॉलर) कमाई केली, असे गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान रुट्ट यांनी माफी मागितल्यानंतर त्यांनी गुलाम बनवलेल्या लोकांच्या वंशजांना नुकसान भरपाई देण्याचे थांबवले. मात्र त्याऐवजी यांनी नेदरलँड्स आणि त्याच्या पूर्वीच्या वसाहतींमध्ये गुलामगिरी सहन करावी लागणाऱ्या वारसांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सरकारने २०० दशलक्ष-युरो (२१० दशलक्ष अमेरिकी डॉलर) निधीची स्थापना केली. मात्र हे पुरेसे नसल्याचे नेदरलँडमधील काही गटांचे म्हणणे आहे.

 

नुकसान भरपाई द्या मगच माफी

डच राजाच्या भाषणापूर्वी ब्लॅक मॅनिफेस्टो आणि ब्लॅक अर्काइव्ह्ज या दोन संघटनांनी शनिवारी ‘नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे’, अशा आशयाचे बॅनर झळकावत निषेध व्यक्त केला. केवळ तोंडी माफी पुरेशी नाही. नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय या दुष्कृत्याला माफी मिळू शकत नाही,’ असे ठाम प्रतिपादन ब्लॅक अर्काइव्ह्जचे संचालक मिशेल एसाजस यांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा