पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या क्वाड समिट आणि संयुक्त राष्ट्रांच्या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत. तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी न्यूयॉर्कच्या नासाऊ कोलिझियममध्ये भारतीय लोकांना संबोधित केले. भारताची पुढील लक्ष्ये आणि विकासाच्या दृष्टीने होत असलेली वाटचाल याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच नरेंद्र मोदींचा हा पंतप्रधान पदाचा तिसरा कार्यकाळ असून या दरम्यान त्यांनी समोर ठेवलेल्या उद्दिष्टांची चर्चाही त्यांनी केली. अशातच आता नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक छोटी क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, आमचे सरकार तिसऱ्यांदा पुन्हा निवडून आले आहे. गेल्या ६० वर्षांत भारतात असे घडले नव्हते. भारतातील जनतेने आम्हाला दिलेला जनादेश खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. यामध्ये तिसऱ्यांदा, आमच्याकडे आणखी मोठी उद्दिष्टे आहेत. पंतप्रधान मोदींनी हे वाक्य उच्चारताच प्रेक्षकांमधील एका माणसाने जोरात ओरडून ‘काशी-मथुरा’ असे म्हटले यानंतर नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले तर इतर प्रेक्षकांनीही आवाज करत सहमती दर्शवली.
-PM Modi : We have bigger things to do in this 3rd term
-Someone from Audience : Kashi- Mathura?*PM Smiles* 😂😂 pic.twitter.com/xf1xBJC1YF
— Mr Sinha (@MrSinha_) September 22, 2024
हे ही वाचा :
भारताचा कायापालट करून डिजिटल इंडियाचे नरेंद्र मोदींचे लक्ष्य
प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन
अमेरिका- इंडिया ही नव्या जगाची ‘एआय’ शक्ती
या प्रसंगाचा छोटा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर लोकांच्या विविध प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, नरेंद्र मोदींच्या त्या स्मितनेचं सर्व काही सांगितले. तर काहींनी म्हटलं आहे की, ‘मोदी है तो मुमकिन है’. राम मंदिर निर्माणानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या भाषणात “अयोध्या फक्त एक झलक आहे, काशी आणि मथुरा बाकी आहे” अशा आशयाच्या घोषणा दिल्या होत्या.